शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत संशयाच्या भोवऱ्यात सापडून प्रेयसीवर चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 15:05 IST

पाच वषार्पासून एकत्र राहत असलेल्या प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेम जुळत असल्याच्या संशयातून हा प्राणघातक हल्ला केला..

ठळक मुद्देतरुणी गंभीर जखमी : प्रियकर अटकेत

पिंपरी : डांगे चौकात एका तरुणीवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेम जुळत असल्याच्या संशयातून हा प्राणघातक हल्ला केला. ही घटना आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास थेरगाव येथील डांगे चौकात घडली.   गौरी विठ्ठल माळी (वय, २०, रा. डांगे चौक) असे चाकूचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी विकास शांताराम शेटे (वय २१, रा. वाडा, खेड) या तरुणाला अटक केली आहे.   पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी गौरी ही डांगे चौकातील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला आहे. गौरी आणि विकास एकाच गावातील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. विकासने मागील पाच वर्षांपूर्वी घरच्यांच्या विरोधात जाऊन गौरीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. तिच्यासाठी त्याने घरदार सोडले. दोघेही चाकण येथे काही दिवस राहिले. त्यानंतर दोघेजण कामानिमित्त मुंबईला गेले.   चार वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून भांडणे होऊ लागली. त्यामुळे गौरी विकासपासून वेगळी राहू लागली. ती एका खासगी रुग्णालयात काम करू लागली. मागील काही दिवसांपूर्वी विकासने गौरीला एका अनोळखी तरुणासोबत पाहिले. त्यातून त्याच्या मनात त्या दोघांविषयी संशय बळावला.    सकाळी दहाच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर निघाली होती. यावेळी तेथे दबा धरुन बसलेल्या आरोपी विकासने पाठीमागून येऊन तिच्यावर चाकूने  वार केले. या घटनेत गौरी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी विकासला अटक केली आहे.  वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकrelationshipरिलेशनशिप