शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

बाप लेकीवर गुन्हा दाखल, ऑनलाईन चलान दिल्याच्या रागातून वाहतूक पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 17:13 IST

Attack On Traffic Police : या रागातून वाहतूक पोलिसाला मारहाण व शिवीगाळ झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजता घडली.

ठळक मुद्देयाप्रकरणी बाप-लेकीवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या समोर शहर वाहतूक विभागाची वाहनांची पाहणी आणि कारवाई दरम्यान वाहन परवाना व कागदपत्र जवळ नसल्याने ऑनलाईन चलन दिले. या रागातून वाहतूक पोलिसाला मारहाण व शिवीगाळ झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी बाप-लेकीवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.शहर वाहतूक शाखा उपविभाग विठ्ठलवाडी यांच्या वतीने वाहतूक पोलीस गणेश चौधरी हे बुधवारी सायंकाळी ७ वाजता विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या सामोरील रस्त्यावर वाहनांची पाहणी व कायदेशीर कारवाई करीत होते. त्या दरम्यान ऍक्टिव्ह गाडीवर आलेल्या मनोज गुरुनानी यांच्याकडे वाहन परवाना व संबंधित कागदपत्र जवळ नसल्याने, ७०० रुपयाचे ऑनलाईन चलन दिले. याप्रकाराने गुरनानी व त्यांच्या सोबत असलेली त्यांची मुलगी संतप्त झाली. गेल्या आठवड्यात माझ्या भावालाही चलन दिल्याचे सांगत शिवीगाळ सुरू केली. तसेच पोलीस नाईक चौधरी यांना मारहाण केली. यावेळी पोलीस कर्मचारी किरण धांडे व पोलीस मित्र स्वप्नील जाधव उपस्थित होते. वाहतूक पोलिसांनी होणाऱ्या मारहाणीचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.वाहतूक पोलीस गणेश चौधरी यांना मारहाण व मारहाण झाल्याचा निषेध शहरातून होत आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मनोज गुरनानी व डिंकी गुरुनानी यांच्यावर गुन्हे दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी