विरार : फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वसई विरार महापालिकेच्या पथकाला जमावाने मारहाण करत दगडफेक केली. या हल्ल्यात पालिकेचे 2 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत तर ३ जणांना दुखापत झाली आहे.टाळेबंदी असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ नंतर बंद करण्याचे आदेश आहेत. मात्र नालासोपारा पूर्वेच्या रेहमत नगर येथे मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसून नियमांचे उलंघन करत होते. यामुळे सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास प्रभाग समिती 'ब' चे प्रभारी साहायक आयुक्त आपल्या पथकासह कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी येथील फेरीवाल्यांनी विरोध केला. काही वेळातच १०० ते १५० जणांचा जमाव तयार झाला. या जमावाने महापालिका पथकाला मारहाण केली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले मात्र जमावाने पोलिसांवरहीदगडफेक केली. अतिरिक्त पोलीस कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
वसई विरार महापालिकेच्या पथकावर नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 19:22 IST
Crime News : या हल्ल्यात पालिकेचे 2 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत तर ३ जणांना दुखापत झाली आहे.
वसई विरार महापालिकेच्या पथकावर नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांचा हल्ला
ठळक मुद्देटाळेबंदी असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ नंतर बंद करण्याचे आदेश आहेत.