शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह पोस्टवरुन हल्ला, शिवसेनेच्या सहसंपर्क, जिल्हा प्रमुखासह १४ जणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 15:20 IST

Crime News :आक्षेपार्ह पोस्टवरुन हल्ला प्रकरण; महिलेचे मंगळसूत्र तुटले

जळगाव : मु‌ख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरुन हेमंत नवनीतलाल दुतिया (वय ४८,रा.धरणगाव) यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांच्यासह १४ जणांविरुध्द सोमवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 हेमंत नवनीतलाल दुतिया हे पत्नी गौरी, मुलगी व सासरे हरेश प्रेमजी भाटे यांच्यासह रविवारी खान्देश सेंट्रल मॉलमधील चित्रपटगृहात ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट बघायला आले होते. पावणे सात वाजता चित्रपट संपल्यानंतर दुतिया बाहेर आले असता शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, राजेंद्र किसन महाजन, धीरेंद्र पुरभे (रा.धरणगाव), शोभा चौधरी, सरिता माळी, भिमा धनगर (रा.नेहरु नगर) व इतर ४ ते पाच जणांनी घेरुन तू मुख्यमंत्र्यांविरुध्द फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट का टाकली असा जाब विचारला, त्यावर आपण अशी कोणतीच पोस्ट टाकली नाही असे सांगितले असता या लोकांनी आपल्यावर आरोप लावून लाथाबुक्यांनी मारहाण केली.

पत्नी गौरी वाद सोडविण्यासाठी आली असता या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले असून त्याचे नुकसान झालेले आहे. त्याशिवाय त्यांच्या उजव्या हाताला मार लागला आहे. या मारहाणीत दुतिया यांच्या नाकातोंडातून रक्त आले. या लोकांनी जीवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावPoliceपोलिसShiv Senaशिवसेना