शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वैभव राऊतच्या घरी पुन्हा एटीएसचे पथक दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 21:03 IST

आता नुकतेच एटीएसचे पथक नालासोपाऱ्यातून वैभवच्या घरून निघाले असून त्याच्या घराच्या मागच्या बाजूस उभी असलेली इंनोवा गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

मुंबई - मागच्या शुक्रवारी नालासोपाऱ्यात भंडारअळी गावातून वैभव राऊत आणि शरद कळसकर यांच्या घरात धाड घालत दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) दोघांना अटक केली होती. त्यानंतर पुण्यातून अटक केलेला आरोपी सुधन्वा आणि वैभवच्या घरी एटीएसने पुन्हा सोमवारी धाड घातली.  यावेळी एटीएसने वैभवच्या घरातून आठ पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि शस्रांचे अनेक सुटे भाग हस्तगत केले. त्याशिवाय दुसरा आरोपी सुधन्वा गोंधळेकर हा टेक्निकल एक्सपर्ट असल्याची माहिती समोर आली आहे. सुधन्वाच्या घरातून एटीएसने ६ हार्ड डिस्क, लॅपटाॅप, नऊ मोबाईल, अनेक सीमकार्ड जप्त केले असून एक कार आणि मोटारसायकलही जप्त केली होती. याआधी एटीएसने सुधन्वाच्या घरातून शस्त्रसाठा जप्त केला होता. इतका शस्त्रसाठा कशासाठी या दोघांनी केला होता याबाबत एटीएसने कसून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान एटीएसचे पथक तिसऱ्यांदा पुन्हा आज दुपारी वैभव राऊतच्या घरी धडकले होते. आज दुपारी ३ वाजता एटीएसने अचानक एसआरपी व लोकल पोलिसांना सोबत घेत वैभवला त्याच्या भंडारआळीतील त्याच्या निवासस्थानी पुन्हा चौकशीसाठी आणले होते.यावेळी साधारण ५० मिनीटे त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी त्याची इंनोवा गाडी (एमएच ४८ , एके २६२६) जप्त केली. यावेळी एटीएसच्या पथकासोबत आलेल्या वैभवने काही वेळ कुटुंबियांशी संवाद साधला असून मी लवकरच घरी येईन असे वैभवने कुटुंबियांना सांगितले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथक