शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

VIDEO : एटीएसची मोठी कारवाई; नऊ जण ताब्यात, आयसिसशी संबंध असल्याचा संशय

By पूनम अपराज | Published: January 22, 2019 5:24 PM

अखेर आज त्यांना एटीएसने ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. 

ठळक मुद्दे२६ जानेवारीला साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्वाची कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.ताब्यात घेतलेल्या सर्वांचे आयसिसची संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज कारवाई करत मुंब्र्यातील कौसा, अमृतनगर येथून चार जणांना तर औरंगाबादेतून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. २६ जानेवारीला साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्वाची कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांचे आयसिसची संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण अनेक दिवसांपासून एटीएसच्या रडारवर होते. अखेर आज त्यांना एटीएसने ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, आम्ही काही संशयित लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. अदयाप काही निष्कर्ष काढू शकत नाही. 

२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर एटीएसची मोठी कारवाई केली आहे. मुंबईत अथवा महाराष्ट्रात काही घातपात होण्याची शक्यता एटीएसला मिळाली होती. त्याअनुषंगाने ही एटीएसने कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेले नऊही जण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित असून राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेला (एनआयए) मिळालेल्या माहितीनुसार ही संलग्न कारवाई करण्यात आली आहे. मुंब्र्यातून ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट देखील केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

गेल्याच महिन्यात एनआयएने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये १६ ठिकाणी छापे घातले होते. दिल्लीच्या जाफराबाद आणि उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये आयसिस संघटनेशी संपर्कात असलेल्या ठिकाणांवर ही मोठी कारवाई करण्यात आली होती. या सर्च ऑपरेशनमध्ये एनआयएसोबतच उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी संघटनांचादेखील सहभाग होता. औरंगाबाद आणि मुंबई एटीएसने औरंगाबादमध्ये पहाटे साडेचारपासून कारवाई सुरु होती अशीही माहिती मिळाली आहे. कैसर कॉलनीत त्यांनी जाहेद नावाच्या माणसाला शोधण्यासाठी छापा टाकण्यात आला. 9 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या सगळ्यांची चौकशी झाल्यावरच आरोपींची माहिती देणार आहेत.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसArrestअटकmumbraमुंब्राAurangabadऔरंगाबादISISइसिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा