शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

BREAKING: लखनऊमध्ये एटीएसची मोठी कारवाई, 'प्रेशर कुकर' बॉम्ब बनवणाऱ्या अल-कायदाच्या २ दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 14:19 IST

ATS arreste Terrorists : सुरक्षेचा उपाय म्हणून जवळपासची घरेही रिकामी करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

ठळक मुद्देकाकोरी हा लखनऊमधील दाट लोकवस्तीचा परिसर आहे, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लखनऊ: घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत माहिती मिळताच एटीएसने लखनऊचा काकोरी परिसराला सील ठोकले आहे. एटीएसला घराच्या आत लावलेल्या प्रेशर कुकर बॉम्बची माहिती मिळाली असल्याने बॉम्ब पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. याची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी एटीएसने हा परिसर सील केला असून कोणालाही निर्बंधित परिसरात जाऊ दिले जात नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून जवळपासची घरेही रिकामी करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

 

एटीएसने दहशतवाद्यांकडून काही प्रमाणात स्फोटकेही जप्त केली असून अटक केलेले दहशतवादी जम्मू स्फोटात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एटीएसने अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. असे म्हटले जात आहे की, या दहशतवाद्यांचे हँडलर पाकिस्तानातील आहेत.या दहशतवाद्यांची चौकशी केली जात आहे आणि आणखी दहशतवादी लपून बसले आहेत का याची माहिती मिळवण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याचे सूत्रांनी पुढे सांगितले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी निर्बंधित परिसरामध्ये जाण्यासाठी वाहतूक बंद केली आहे आणि शोधमोहीम सुरू असेपर्यंत परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.काकोरी हा लखनऊमधील दाट लोकवस्तीचा परिसर आहे, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ताज्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कायदा व सुवस्थेने एडीजी आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणार असून त्यावेळी या कारवाईविषयी अधिक माहिती समोर येईल.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसBombsस्फोटकेUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसterroristदहशतवादीArrestअटक