शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

एटीएसची मोठी कारवाई; ५३ कोटी किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 20:37 IST

पाचजणांना अटक

ठळक मुद्दे अमली पदार्थाविरोधातील एटीएसएची ही गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.एमडी हे तंत्रज्ञान व अत्यंत उच्च दर्जाचे रसायन वापरुन बनविण्यात आलेले आहे.

मुंबई - मुंबई व राज्यातील अन्य प्रमुख शहरात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पर्दाफाश केला आहे. पाच तस्करांना अटक करुन त्यांच्याकडून तब्बल १२९ किलो मेफिड्रिन (एमडी) जप्त केले आहे. अमली पदार्थाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात त्याती किंमत तब्बल ५२ कोटी ६४ लाख ९४ हजार इतकी आहे. अमली पदार्थाविरोधातीलएटीएसएची ही गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.जितेद्र पर्मात (३६) अब्दुल रझाक शेख (वय ४७), इरफान शेख (४३), सुलेमान शेख (२८), नरेश मस्कर (४४), अशी या तस्कराची नावे असून या टोळीत आणखी काही साथीदार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली. एटीएसच्या विक्रोळी कक्षातील संदीप विश्वासराव, अनिल ढोले यांना एमडी विकण्याकरीता काहीजण दुतग्रती महामार्गावरील भांडूप येथील एका बस स्टॉपजवळ सोमवारी येणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून एका गाडीतून आलेल्या दोघाजणांना पकडले. त्यांच्याकडील झडतीत ९ किलो एमडी मिळून आले, अब्दुल शेख व इरफान असे नाव असलेल्या दोघाकडे कसून चौकशी केली असता त्यांनी मुंबई व अन्य ठिकाणी विक्रीसाठी आणखी एमडी असल्याचे सांगितले. त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून पथकाने त्यांच्या तिघा साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडे १२० किलो एमडी मिळाले.एमडी हे तंत्रज्ञान व अत्यंत उच्च दर्जाचे रसायन वापरुन बनविण्यात आलेले आहे. बनविण्यात येत असलेला कारखाना व वितरित केलेल्या अन्य ठिकाणी शोध मोहीम सुरु असून अमली पदार्थ विक्री करणारे हे देशातील मोठे रॅकेट आहे, असे एटीएसचे प्रमुख देवेन भारती, उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे, उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले.

४० लाखाला एक किलो एमडीएटीएसने जप्त केलेले एमडीची अंमली बाजारपेठेत एक किलोला सरासरी ४० लाख रुपये घेतले जातात, उच्च दर्जाचे रासायनिक वापरुन बनविण्यात आल्याने त्याला मोठी मागणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसArrestअटकDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी