शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताचा कट एटीएसने उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 22:19 IST

चंदौली येथील पडाव परिसरातून राशिदला बेड्या ठोकण्यात आल्या.

ठळक मुद्देराशिद सध्या वाराणसीत पोस्टर आणि बॅनर लावण्याचं काम करत होता. एका दहशतवाद्याला मथुरेत अटक करण्यात आली आहे. तर दोन दहशतवादी फरार झाले आहेत. दुसऱ्या कराची भेटीत त्याची चुलत भाऊ शजेबने त्याची आयएसआय आणि पाकिस्तानी मिलिटरी इंटेलिजन्स असलेल्या अशिम आणि अमद यांची भेट करून दिली.

वाराणसी - लष्कराच्या गुप्तचर विभागासह उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपाताचा कट उधळला आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद राशिद (२३) असं अटक केलेल्या एजंटचे नाव आहे. चंदौली येथील पडाव परिसरातून राशिदला बेड्या ठोकण्यात आल्या.एटीएसच्या सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, राशिदची सर्व सूत्रे पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणा आणि आयएसआयच्या इशाऱ्यावर चालत होती. जोधपूरमधील भारतीय लष्काराच्या हलचालींची माहिती तो आयएसआयला देत होता.  सीआरपीएफ अमेठीचा माहितीही त्याने आयएसआयला दिली आहे. तो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आयएसआयला पाठवत होता. राशिद सध्या वाराणसीत पोस्टर आणि बॅनर लावण्याचं काम करत होता. रशीदचे नातेवाईक कराचीत राहतात. तो त्यांच्याकडे २०१७ साली दोनदा गेला होता. तसेच २०१८ - २०१९ मध्ये राशीद कराचीत काही लग्नसोहळ्यात देखील उपस्थित राहिला होता. तो कराचीत त्याची आत्या हसीना, तिचा नवरा शागिर अहमद  आणि त्यांचा मुलगा शजेब यांच्यासोबत कराचीतील ओरंगी शहरात राहत असे. दरम्यान कराचीत भेटीतच्या वेळी तो चुलत भावाच्या प्रेमात पडला. तसेच दुसऱ्या कराची भेटीत त्याची चुलत भाऊ शजेबने त्याची आयएसआय आणि पाकिस्तानी मिलिटरी इंटेलिजन्स असलेल्या अशिम आणि अमद यांची भेट करून दिली. या दोघांनी रशिदकडून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून भारतीय फोन नंबर आणि फोटो तसेच महत्वाची माहिती मागवून घेतली.

पाकिस्तानी हॅंडलरच्या सांगण्यावरून राशिदला दोन भारतीय सिम कार्ड अ‍ॅक्टिवेट ओटीपी देण्यात आले होते. भारतीय सिम कार्डपर व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्ह करुन पाकिस्तानी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आपला अजेंडा राबवत होती. राशिदकडून पेटीएमच्या माध्यमातून आलेले ५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळला आहे. एका दहशतवाद्याला मथुरेत अटक करण्यात आली आहे. तर दोन दहशतवादी फरार झाले आहेत.

टॅग्स :terroristदहशतवादीISIआयएसआयUttar Pradeshउत्तर प्रदेशAnti Terrorist SquadएटीएसArrestअटकPakistanपाकिस्तान