शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी घटनास्थळीच पकडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:14 IST

Crime News : त्यांनी लगेच सदर पोलीसांना माहिती देऊन तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे स्वप्नील रामचंद्र जांभुळकर ( वय ४३, रा. खलाशी लाईन मोहन नगर), प्रवीण नामदेवराव लव्हाले ( वय ४३, रा. म्हाळगी नगर, हुडकेश्वर) आणि आकाश धर्मेंद्र नाईक (वय ४६, रा. खलाशी लाईन, सदर) असल्याचे स्पष्ट झाले.

नागपूर : एटीएम फोडत असलेल्या एका त्रिकुटाला सदर पोलिसांनी घटनास्थळी रंगेहात पकडले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहन नगर आहे. या भागातील भीमसेन चौकातील ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडले जात असल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना शुक्रवारी पहाटे तीन वाजता कळली.

त्यांनी लगेच सदर पोलीसांना माहिती देऊन तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठाणेदार विनोद चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. एटीएम मध्ये तीन आरोपी हातोडी,कटर आणि पेचकसच्या सहाय्याने एटीएम फोडून रक्कम काढण्याच्या तयारीत पोलिसांना दिसले. पोलीस पथकाने त्यांना घटनास्थळीच जेरबंद केले. पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे स्वप्नील रामचंद्र जांभुळकर ( वय ४३, रा. खलाशी लाईन मोहन नगर), प्रवीण नामदेवराव लव्हाले ( वय ४३, रा. म्हाळगी नगर, हुडकेश्वर) आणि आकाश धर्मेंद्र नाईक (वय ४६, रा. खलाशी लाईन, सदर) असल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी त्यांच्याकडून कटर, मशीन, पेंचीस, चाकू, बॅग जप्त केली. त्यांच्याविरुद्ध सदर पोलीस ठाणे कलम ३७९,५११,४२७,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दुपारी आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसाचा पीसीआर मिळविण्यात आला. पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोटे, पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.आरोपीचा ओव्हर कॉन्फिडन्स आरोपींनी एटीएम कसे फोडायचे आणि रक्कम कशी काढायची याबाबत बरेच दिवस अभ्यास केला. युट्युबवर व्हिडिओ बघितले आणि नंतर मोठी रक्कम हाती पडेल या विश्वासाने ते पहाटेच्या वेळी या एटीएममध्ये शिरले. मोठी रक्कम मशीन मध्ये असेल असा त्यांना विश्वास होता. ती नेण्यासाठी त्यांनी भली मोठी बॅगही सोबत घेतली होती. परंतु पोलिसांनी त्यांना वेळीच जेरबंद करून त्यांचा डाव उधळला.

टॅग्स :atmएटीएमRobberyचोरीPoliceपोलिसnagpurनागपूरArrestअटक