शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

'सगळं माझ्यामुळे झालं...' मुलाच्या एनकाउंटरनंतर अतिक अहमदने पोलिसांकडे केली 'ही' विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 18:51 IST

आज उमेश पाल हत्याकांडातील मुख्य आरोपी असद अहमद एनकाउंटरमध्ये ठार झाला.

झाशी: आजचा दिवस उत्तर प्रदेशसाठी फार महत्वाचा दिवस ठरला आहे. राजू पाल हत्याकांडातील साक्षीतार उमेश पाल याच्या हत्येतील प्रमुख आरोपी आणि माफइया अतिक अहमदचा मुलगा असद अहमद एनकाउंटरमध्ये ठार झाला आहे. त्याच्यासोबत गुलाम नावाचा त्याचा साथीदारही ठार झाला आहे. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच अतिक कोर्टातच ढसाढसा रडला. यावेळी आपल्या पापाची शिक्षा मुलाला भेटली, अशा भावना त्याने व्यक्त केल्या. 

आज योगायोगाची बाब म्हणजे झाशीच्या बडागाव पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या चकमकीत असद अहमद ठार झाला आणि त्याचवेळी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना प्रयागराज न्यायालयात हजर केले जात होते. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी आतिकला समजताच तो रडू लागला. काका अश्रफलाही मोठा धक्का बसला. जवळपास 40 दिवस फरार असलेला असद अखेर पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. अतिक मुलाच्या मृत्यूला स्वत:ला जबाबदार मानत आहे. दरम्यान, आता त्याने पोलिसांकडे मुलाच्या मातीत (अंतिम संस्कार) जाण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. 

यूपी पोलिसांना असदला जिवंत पकडायचे होतेअसद आणि मोहम्मद गुलाम हे आज झाशीतील बारागाव ते चिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिचा धरणाच्या परिसरात लपले होते. यूपी एसटीएफचे एडीजी अमिताभ यश यांनी सांगितले की, असद आणि गुलाम यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी एसटीएफ टीमवर गोळीबार केला, त्यानंतर चकमकीत ते मारले गेले. 12 पोलिसांच्या पथकाने ही चकमक पार पाडली.

अशी झाली चकमकअसद आणि मोहम्मद गुलाम हे दोघे मोटरसायकलवरून जात होते. त्यामुळे पोलिस आणि यूपी स्टॅप टीमने दोघांनाही रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान असद आणि मोहम्मद गुलाम यांनी पोलिस पथकावर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी सुमारे 40 राऊंड गोळीबार करण्यात आला आणि असद आणि गुलाम हे दोन्ही शूटर ठार झाले. त्यांच्याकडून ब्रिटीश बुलडॉग रिव्हॉल्व्हर आणि वॉल्थर पिस्तूल सापडले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीyogi adityanathयोगी आदित्यनाथ