रहस्य... ICU मध्ये आईस्क्रीम खाल्ले आणि एअरहॉस्टेसचा मृत्यू झाला; नंतर मावसभावाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 01:29 PM2021-07-05T13:29:31+5:302021-07-05T13:33:38+5:30

Crime News: रोझीच्या मृत्यूच्या २४ तासांच्या आत सॅम्युअल संगमाचाही संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघांच्याही मृत्यूनंतर पूर्वोत्तर राज्यांच्या नागरिकांनी सोशल मीडियावर असंतोष जाहीर केला आहे.

Ate ice cream in the ICU and the airhostess died; Later relative committed suicide | रहस्य... ICU मध्ये आईस्क्रीम खाल्ले आणि एअरहॉस्टेसचा मृत्यू झाला; नंतर मावसभावाची आत्महत्या

रहस्य... ICU मध्ये आईस्क्रीम खाल्ले आणि एअरहॉस्टेसचा मृत्यू झाला; नंतर मावसभावाची आत्महत्या

googlenewsNext

गुरुग्रामच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका एअर हॉस्टेसचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आयसीयूमध्ये आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तिचा मृत्यू झाला, यानंतर तिच्या मावसभावाचा मृतदेह गळफास घेतलेला आढळल्याने या रहस्यमयी मृत्यूमुळे मोठा वादंग सुरु झाला आहे. 
रोझी संगमा ही नागालँडच्या दीमापूरची राहणारी होती. ती एअर हॉस्टेस होती. हे प्रकरण सॅम्युअल संगमाने सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सॅम्युअल संगमाही तिची मावशी होती. (airhostess died after ate ice cream in ICU.)

रोझीच्या मृत्यूच्या २४ तासांच्या आत सॅम्युअल संगमाचाही संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघांच्याही मृत्यूनंतर पूर्वोत्तर राज्यांच्या नागरिकांनी सोशल मीडियावर असंतोष जाहीर केला आहे.

हे दोघे दिल्लीच्या बृजवासन भागात भाड्याने राहत होते. घटना २३ जूनच्या रात्रीची होती. रात्री अचानक रोझीच्या हाता, पायात खूप वेदना होऊ लागल्या. तसेच प्रायव्हेट पार्ट मधून रक्तस्त्राव होऊ लागला. यामुळे मावस भावाने तिला दिल्लीच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जिथे तिची प्रकृती बिघडली आणि तिला २४ जूनच्या सकाळी ६ वाजता, गुरुग्रामच्या अल्फा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

मावस भावाने हॉस्पिटमधून बनविलेल्या व्हिडीओमध्ये, रोझीची तब्येत सुधारली होती. आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या उपस्थितीत तिला आईस्क्रीम देण्यात आले. यानंतर तिची तब्येत बिघडली व तिचा मृत्यू झाला. यावर आम्ही जेव्हा व्हिडीओ बनविण्यास सुरुवात केली तेव्हा डॉक्टरांनी तिला मारहाण केली, असे सांगितले आहे. मेघालयच्या खासदाराने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली आहे. 
 

Web Title: Ate ice cream in the ICU and the airhostess died; Later relative committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.