शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

सामाजिक कार्यकर्त्यावर दुचाकीवरून आलेल्या युवकांचा प्राणघातक हल्ला; नारायणगाव येथील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 10:11 PM

हा हल्ला नारायणगाव येथील मोठी वर्दळ असलेल्या कोल्हेमळा चौकात झाला.

नारायणगाव : नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संग्राम जगन्नाथ घोडेकर ( वय ५५ ) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात युवकांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. हा हल्ला गुरुवारी ( दि . ७ ) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील मोठी वर्दळ असलेल्या कोल्हेमळा चौकात झाला आहे . दरम्यान, घोडेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे .

संग्राम घोडेकर हे कोल्हेमळा येथील मधुकोश सोसायटीत राहत आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते घरगुती गॅसची टाकी स्कुटीवर घेऊन जात होते . घरापासून काही अंतरावर असलेल्या कोल्हेमळा चौकात आले असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात युवकांनी त्यांना थांबण्याचा इशारा केल्याने ते थांबले. त्याचवेळी दुचाकीवर मागे बसलेल्या दोन युवकांनी घोडेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा वर्मी घाव डोक्यात बसल्याने घोडेकर हे खाली कोसळले . काही लोकांनी त्यांना नारायणगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले . परंतु गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे . संग्राम घोडेकर यांची पत्नी सौ . रत्ना घोडेकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्या फिर्यादीत स्थानिक एका जेष्ठ पुढारी आणि त्यांचा मुलगा यांची नावे दिली असल्याचे समजते. हा हल्ला रो – हाऊसच्या मालकी हक्क वादातून झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याचे समजते . मात्र पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही .

नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांना परिसरातून सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले असून हल्लेखोर हे १७ ते १८ वर्षाचे असावेत असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे . हा हल्ला रो - हाऊसच्या मालकी हक्कावरून की जमीन खरेदी विक्रीच्या आर्थिक व्यवहारातुन किवा राजकीय संघर्षातून झाला आहे याचा तपास पोलीस करीत आहे .

टॅग्स :narayangaonनारायणगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी