शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; बदलापूरात दहशतीचं वातावरण

By पंकज पाटील | Updated: September 21, 2022 10:22 IST2022-09-21T10:21:38+5:302022-09-21T10:22:15+5:30

या मारहाणीत मोरे यांना दुखापत झाली असून त्यांना लागलीच बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Assault on former Shiv Sena corporator Avinash More; An atmosphere of terror in Badlapur | शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; बदलापूरात दहशतीचं वातावरण

शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; बदलापूरात दहशतीचं वातावरण

बदलापूर -  शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्यावर पाच जणांनी मिळून हल्ला केला आहे. बंदुकीचा धाक दाखवत अविनाश मोरे यांना मारहाण करण्यात आली आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला आहे.

मंगळवारी रात्री माजी नगरसेवक अविनाश मोरे हे आपल्या कारमधून घरी जात होते. त्याचवेळी शिरगाव परिसरात पप्पू बागुल आणि त्याच्या चार साथीदारांनी मोरे यांची कार अडवली आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवत बाहेर काढले. यावेळी मोरे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच बागुल आणि त्याच्या साथीदारांनी अविनाश मोरे यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत मोरे यांना दुखापत झाली असून त्यांना लागलीच बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बागुल याच्यावर या आधी देखील गंभीर प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. माजी नगरसेवकावर बदलापुरात हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Assault on former Shiv Sena corporator Avinash More; An atmosphere of terror in Badlapur