शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या; गड्डीगोदाममधील घटना, आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 14:40 IST

परिसरात तणाव, आरोपी फरार

नागपूर : नागपुरात गेल्या बारा तासात  हत्येच्या दोन घटना घडल्या मृतांमध्ये एका माजी नगरसेवकाचाही समावेश आहे.सदर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनांमुळे त्या त्या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गड्डीगोदाम परिसरात माजी नगरसेवक देवा उसरे यांची दोन आरोपीने रविवारी भल्या सकाळी निर्घुण हत्या केली.

गेल्या टर्ममध्ये उसरे काँग्रेसचे नगरसेवक होते. तीन वेळा ते महापालिकेत निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत ते महापालिकेत निवडून येऊ शकले नाही. मात्र परिसरातील नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी ते रोज सकाळी आपल्या प्रभागात  फिरत होते. नेहमीप्रमाणे रविवारी भल्या सकाळी उठून ते आपल्या बुलेटने परिसरात फिरले आणि ७.३० वाजताच्या सुमारास नेहमीच्या चहाच्या टपरीवर चहा घ्यायला आले. बुलेटवरून उतरत असतानाच तोंडाला मास्क आणि स्कार्फ बांधून आलेल्या दोन पैकी एका आरोपीने त्यांच्या पाठीत चाकू भोसकला.

बचावासाठी उसरे यांनी दोन्ही आरोपींचे केस पकडून त्यांचा प्रतिकार केला. तेवढ्यात दुसरा आरोपीने त्यांच्यावर डोक्यावर कुर्‍हाड मारली. ते खाली पडल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर चाकू आणि  कुर्‍हाडीचे घाव घालून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. त्यांची हालचाल थांबल्यानंतर शिवीगाळ करत आरोपी पळून गेले. वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. उसरे यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी त्यांना  मेयो इस्पितळात नेले. तेथे डॉक्टरांनी उसरे यांना मृत घोषित केले. दरम्यान, ही माहिती कळताच आमदार विकास ठाकरे तसेच काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येत इस्पितळात पोहोचले. मालमत्तेच्या कब्जावरून वाद 

उसरे यांची हत्या मालमत्तेच्या कब्जावरून झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, उसरे यांच्या मालकीच्या घरात आरोपी भाड्याने राहत होते. घर खाली करण्याच्या विषयावरून आरोपी आणि उसरे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. त्याच्या पोलिसांकडे तक्रारीही झाल्या होत्या. शेवटी या वादात उसरे यांचा बळी गेला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीचा  छडा लागला नव्हता. मृत उसरे यांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. पोलीस त्यासंबंधाने ही अहवाल शोधत आहेत.हत्येची दुसरी घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली. जुन्या वादातून चेतन किशोर मेटांगळे (वय २७, रा. मानेवाडा रिंग रोड)  याला आरोपी बादल नेताम, निलेश गेडाम, रोशन धुर्वे आणि अश्विन नामक आरोपींनी धारदार शस्त्राने भोसकून ठार मारले. उदयनगर गार्डन जवळ ही घटना घडली. गाडीच्या पार्किंगच्या वादातून ही हत्या घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, अवैध दारूच्या धंद्यावरून निर्माण झालेल्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. सचिन किशोर मेटांगळे (वय २९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपी नेताम, गेडाम आणि धुर्वे या तिघांना अटक करण्यात आली. चौथा आरोपी फरार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेसPoliceपोलिस