आसाममधील जोरहाट जिल्ह्यात मंगळवारी एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या मुलाच्या परीक्षेचा रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यामध्ये ती व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर पडताना दिसत आहे. डॉक्टरांनी नंतर पुष्टी केली की, 'सडन कार्डियक अरेस्ट' मुळे मृत्यू झाला आहे.
जोरहाटमधील 'सॅमफोर्ड स्कूल'मध्ये ही दुःखद घटना घडली. ३५ वर्षीय दिपांकर बोरदोलोई हे स्थानिक सिंचन विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा या शाळेत यूकेजी (UKG) मध्ये शिकतो. मंगळवारी सकाळी ते मुलाचा रिझल्ट घेण्यासाठी उत्साहाने शाळेत पोहोचले होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपांकर सकाळी शाळेत पोहोचले होते. तिथे चालत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले.
शाळेतील शिक्षक आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर पालकांनी तातडीने त्यांना उचलून जवळच्या 'जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल'मध्ये (JMCH) नेलं. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. या घटनेने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
डॉक्टरांच्या मते, दिपांकर यांना सडन कार्डियक अरेस्ट आला होता. जो अनेकदा कोणतीही पूर्वलक्षणं न दाखवता अचानक येतो आणि व्यक्तीला काही सेकंदात बेशुद्ध करतो. वेळेवर सीपीआर (CPR) मिळाल्यास कधीकधी जीव वाचू शकतात, परंतु अनेक प्रकरणांमध्ये हा जीवघेणा ठरतो. या घटनेनंतर शाळा परिसरात शोककळा पसरली असून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठा धक्क्यात आहेत.
Web Summary : In Assam, a father tragically died of sudden cardiac arrest while collecting his son's school report. The incident occurred at Samford School, Jorhat. Dipankar Bordoloi, an executive engineer, collapsed and was pronounced dead at the hospital. The sudden loss has devastated the family.
Web Summary : असम के जोरहाट में बेटे का रिज़ल्ट लेने गए एक पिता की अचानक कार्डियक अरेस्ट से मौत हो गई। यह घटना सैमफोर्ड स्कूल, जोरहाट में हुई। कार्यकारी अभियंता दिपांकर बोरदोलोई बेहोश हो गए और अस्पताल में मृत घोषित कर दिए गए। इस घटना से परिवार सदमे में है।