Ashneer Grover BharatPe Fraud: बायकोने ८८ कोटींचे बिल लावले; शार्क टँक इंडियावाले अशनीर ग्रोवर अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 14:12 IST2022-12-09T14:11:44+5:302022-12-09T14:12:10+5:30
भारत पे आणि ग्रोवर यांच्यातील वाद आता कोर्टापर्यंत गेला आहे. भारत पेने ग्रोवर यांची पत्नी आणि नातेवाईकांवर कंपनीचे ८८ कोटी रुपये हडप केल्याचा आरोप केला आहे.

Ashneer Grover BharatPe Fraud: बायकोने ८८ कोटींचे बिल लावले; शार्क टँक इंडियावाले अशनीर ग्रोवर अडचणीत
नवी दिल्ली : शार्क टँक इंडियावाले अशनीर ग्रोवर यांचे सोशल मीडियावर खूपसारे मीम्स व्हायरल होत असतात. याच अशनीर ग्रोवर यांच्या अडचणींत आता वाढ झाली आहे. भारत पे आणि ग्रोवर यांच्यातील वाद आता कोर्टापर्यंत गेला आहे. भारत पेने ग्रोवर यांची पत्नी आणि नातेवाईकांवर कंपनीचे ८८ कोटी रुपये हडप केल्याचा आरोप केला आहे. पत्नी आणि कंपनीची माजी हेड ऑफ कंट्रोल्स माधुरी जैनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत पे (BharatPe) ने अशनीर ग्रोवर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन आणि त्यांचे मेहुणे, सासरे आणि कुटुंबातील अनेक सदस्यांना 88 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बनावट बिले, कंपनीच्या सेवा, बनावट विक्रेते आदी दाखवून ८८ कोटींचा फ्रॉड केला आहे. ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नीने कंपनीच्या निधीचा गैरवापर करून भारतपेचे नुकसान केले आहे. भारतपेने माधुरी जैन यांच्याविरोधात आयपीसी कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोप खरे ठरले तर ग्रोवर यांच्या पत्नीला 7 वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. अल्वारेझ आणि मार्सल यांनी या घोटाळ्याची चौकशी केली होती. या तपास अहवालाच्या आधारेच दोघांना भारतपेमधून बाहेर काढण्यात आले होते. आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीने अशनीर ग्रोवरविरुद्ध १७ प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. सुमारे 30 बनावट विक्रेत्यांची बिले बनवली गेली, ज्यांची किंमत सुमारे 71.1 कोटी रुपये होती. या विक्रेत्यांचा शोध घेतला असता या नावाचा कोणीही विक्रेता नसल्याचे आढळून आले. या बनावट कंपन्यांमुळे भारतपेला जीएसटीकडे १.६६ कोटींचा दंड भरावा लागला होता. माधुरी जैन यांनी थर्ड पार्टी रिक्रुटमेंटसाठी 7.6 कोटी रुपयांचे बिल तयार केले. परंतू त्यांची सेवा कधीही घेतली गेली नाही. महत्वाचे म्हणजे यातील 8 कंत्राटदार ग्रोव्हर कुटुंबाशी संबंधित होते.