शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

बापरे...! 27 वर्षांमध्ये चोरल्या तब्बल 5000 कार; सर्वात मोठ्या कार चोराला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 12:11 IST

आरोपीला सोमवारी मध्य दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने देशबंधू गुप्ता रोड परिसरातून टीप मिळाल्यानंतर अटक केली.

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी अनिल चौहान (५२) नावाच्या एका चोराला पकडले आहे. त्याच्यावर २७ वर्षांमध्ये तब्बल ५००० हून जास्त गाड्या चोरल्याचा आरोप आहे. कार चोरीव्यतिरिक्त अनिलवर खून, शस्त्रास्त्र कायदा आणि तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. तो देशातील सर्वात मोठा कार चोर असल्याचा पोलिसांचा दावा आहे.आरोपीला सोमवारी मध्य दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने देशबंधू गुप्ता रोड परिसरातून टीप मिळाल्यानंतर अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो उत्तर प्रदेशमधून शस्त्रे आणून नागालँडमधील प्रतिबंधित संघटनांना पुरवत होता. त्यामुळे पोलीस दहशतवादाच्या दृष्टिकोनातूनही तपास करत आहेत. 

अमाप संपत्ती : चाैहान हा आसामला गेला आणि तिथे राहू लागला. चोरीद्वारे बेकायदा संपत्तीच्या जोरावर त्याने दिल्ली, मुंबई आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मालमत्ता जमवली. अंमलबजावणी संचालनालयानेही त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. अनिलला अनेक वेळा अटक करण्यात आली होती. २०१५ मध्ये काँग्रेस आमदारासोबतही त्याला अटक झाली हाेती. 

रिक्षा चालवायचा...- अनिलने ९०च्या दशकात सर्वाधिक गाड्या (मारुती ८००) चोरल्या होत्या. चोरीदरम्यान त्याने काही टॅक्सी चालकांनाही ठार केले. चोरलेल्या गाड्या तो जम्मू-काश्मीर, नेपाळ आणि ईशान्येकडील राज्यांत विकायचा. - १९९० मध्ये तो दिल्लीच्या खानपूर भागात राहत होता आणि ऑटो रिक्षा चालवायचा. त्यानंतर तो गुन्हेगारीच्या जगात आला आणि कार चोरायला सुरुवात केली, नंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

तीन पत्नी आणि सात मुलेअनिलवर १८० गुन्हे दाखल असून त्याच्या तीन पत्नी आणि सात मुले आहेत. तो आसाममध्ये सरकारी कंत्राटदार बनला होता. पोलिसांनी त्याच्याकडून सहा पिस्तूल आणि सात काडतुसे जप्त केली आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोरPoliceपोलिस