शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

बर्थडेच्या पूर्वसंध्येला आर्यन खानची चौकशी; NCB च्या विशेष पथकासमोर तळोजा येथे झाला हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 7:23 PM

Aryan Khan's interrogation on the eve of his birthday : समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग प्रकरणाचा तपास काढून घेतल्यानंतर प्रथमच आर्यन खान एनसीबीच्या विशेष टीमसमोर हजर झाला आहे.

पनवेल - ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानच्या मुलाला चौकशीसाठी तळोजा येथील आरएएफ मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी आणण्यात आले आहे. एनसीबीच्या विशेष टीम आर्यन खानची चौकशी करीत आहे. समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग प्रकरणाचा तपास काढून घेतल्यानंतर प्रथमच आर्यन खान एनसीबीच्या विशेष टीमसमोर हजर झाला आहे.  

एनसीबीच्या कार्यालयाबाहेर होणारी गर्दी, तपासात कोणताही व्यत्यय नको म्हणून आर्यन खानला चौकशीसाठी थेट तळोजा येथील आरएएफ मुख्यालयात आणले आहे.सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा १३ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. आर्यन उद्या २४ वर्षांचा होईल. गेल्या २ महिन्यांपासून आर्यन खान अडचणीत आहे. ड्रग्ज पार्टीत सापडल्यानं आर्यनला एनसीबीनं अटक केली. जवळपास तीन आठवडे तो तुरुंगात होता. त्यानंतर त्याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. ड्रग्ज पार्टी प्रकरणाची सुनावणी उद्याप पूर्ण झालेली नाही. यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आर्यनकडून सुरू आहे. त्यामुळे आर्यनचा वाढदिवस अतिशय साधेपणानं साजरा होईल.

आर्यनचे आतापर्यंतचे वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरे झाले आहेत. मात्र यावर्षी तसा वाढदिवस साजरा होण्याची शक्यता कमी आहे. इंडिया टुडेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, आर्यनचा २४ वा वाढदिवस अतिशय साधेपणानं साजरा होईल. वाढदिवसाला कुटुंबीय असतील. बहिण सुहाना अमेरिकेहून कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित असणार आहे. मात्र, आर्यन खान वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एनसीबीच्या चौकशीला सामोरं जावं लागत आहे. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानShahrukh Khanशाहरुख खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थ