Aryan Khan's drug case live updates: 'आर्यन खानला आज जामिन मिळणार नाही'; मित्राने म्हटले, शाहरुखने 'आशा' सोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 16:26 IST2021-10-26T16:24:29+5:302021-10-26T16:26:31+5:30
Aryan Khan Bail hearing in Drug Case: मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामिनावर सुनावणी सुरु आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि पूजा ददलानीचे नाव घेत आर्यनला जामिन देऊ नये अशी मागणी केली आहे. तर साक्षीदार पलटल्याशी आपला काहीही संबंध नाही असे प्रतिज्ञापत्र आर्यनच्या वकिलांनी दिले आहे.

Aryan Khan's drug case live updates: 'आर्यन खानला आज जामिन मिळणार नाही'; मित्राने म्हटले, शाहरुखने 'आशा' सोडली
महिन्याच्या सुरुवातीला शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीने मुंबईत क्रूझ रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले होते. हा आर्यन आजवर तुरुंगात आहे. शाहरुखने जंग जंग पछाडूनही, तीन वकील बदलले तरी आज उच्च न्यायालयात आर्यनला जामिन मिळण्याची आशा सोडल्याचे त्याच्या एका जवळच्या मित्राने म्हटले आहे. (Mumbai Cruise Drugs Case)
मुंबई उच्च न्यायालयातआर्यन खानच्या जामिनावर सुनावणी सुरु आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि पूजा ददलानीचे नाव घेत आर्यनला जामिन देऊ नये अशी मागणी केली आहे. तर साक्षीदार पलटल्याशी आपला काहीही संबंध नाही असे प्रतिज्ञापत्र आर्यनच्या वकिलांनी दिले आहे. माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी आर्यनची केस लढत आहेत. या साऱ्या माहोलात शाहरुखच्या मन्नतवर वातावरण कसे आहे, हे शाहरुखच्या जवळच्या मित्राने सांगितले आहे.
या मित्राने एका न्यूज चॅननला सांगितले की, शाहरुख खान आणि गौरी खान यांना आर्यनला आज जामिन मिळणार नाही असे वाटत असल्याचे म्हटले आहे. आर्यनला आज जामिन मिळणार नाही आणि हे प्रकरण आणखी काही दिवस चालेल. आणखी काही दिवस आर्यन समोरची संकटे वाढतील, असे शाहरुखला वाटत असल्याचे हा मित्र म्हणाला.
कोर्टात काय घडले...
आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टात गोंधळ उडाला आहे. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले. कोर्टातील कर्मचा-यांनी सर्वांना बाहेर काढलं असून पंधरा मिनिटांच्या व्यत्ययानंतर मीडिया आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
आर्यनने मुंबई हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात तो प्रभाकर साईलला ओळखत नाही किंवा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. अलीकडे जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. आर्यन खानने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, हा एनसीबीचे अधिकारी आणि राजकीय लोकांमधील वाद आहे. मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कोणताही आरोप केलेला नाही असं म्हटलं आहे.