शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

Aryan Khan Drug Case: आर्थर रोड तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा वाढवली, स्पेशल बॅरेकमध्ये हलवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 7:12 PM

Aryan Khan Drug Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shahruk Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case) अटक करण्यात आलेली असून तो सध्या मुंबईतील आर्थर रोड (Arthur Road Jail) तुरुंगात आहे.

Aryan Khan Drug Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shahruk Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case) अटक करण्यात आलेली असून तो सध्या मुंबईतील आर्थर रोड (Arthur Road Jail) तुरुंगात आहे. कोर्टानं आर्यनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. एनसीबीची (Narcotics Control Bureau-NCB) कोठडी संपल्यानंतर आर्यन खानला इतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा आता वाढवली आहे. आर्यनला स्वतंत्र आणि स्पेशल बॅरेकमध्ये हलविण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक पातळीवर आर्यन खानवर लक्ष ठेवलं जात आहे. 

ड्रग्ज प्रकरणाशी निगडीत इतर आरोपींशी आर्यन खान तुरुंगात अजिबात बोलत नाही. तुरुंगातील परिस्थीती आणि जेवण देखील आर्यन खानला जात नसल्याचं समोर आलं आहे. तुरुंगातील जेवण आर्यन खान खात नसल्यानं त्याच्या प्रकृतीबाबतही चिंता आता तुरुंग प्रशासनाला लागून राहिली आहे. 

शाहरुखनं आर्यनला पाठवली ४५०० रुपयांची मनी ऑर्डरतुरुंगाचे अधिक्षक नितीन वायचाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान याला ११ ऑक्टोबर रोजी साडेचार हजार रुपयांची मनी ऑर्डर त्याचे वडील शाहरुख खान यांनी पाठवली आहे. या पैशांचा खर्च आर्यन खान याला तुरुंगातील कॅन्टीनमधील जेवणावर करु शकतो. पण तुरुंगात आर्यन पोटभर जेवण करत नसल्याचं सांगण्यात येत आहे. तुरुंग प्रशासनाच्या नियमानुसार प्रत्येक कैद्याला दरमहा फक्त साडेचार हजार रुपये मनी ऑर्डरच्या स्वरुपात मागविण्याची परवानगी आहे.  

चांगला व्यक्ती बनून दाखवेन, आर्यननं दिलं वचनएनसीबीचे झोनल अधिकारी समीन वानखेडे यांना आर्यन खाननं तुरुंगाबाहेर आल्यानंतर चांगला व्यक्ती बनून दाखवेन आणि तुम्हाला माझा एक दिवशी अभिमान वाटेल असं काम करेन, असं वचन दिल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्स सेवन प्रकरणी एनसीबीकडून आर्यन खानचं समुपदेशन करण्यात आलं. त्यावेळी आर्यन खाननं आपल्या चुकीची माफी मागत यापुढे अशाप्रकारचं काम आपल्या हातून होणार नाही, असं वचन दिलं आहे. याशिवाय आर्थिक दुर्बल घटकाला मदत करण्याचंही वचन आर्यननं समीर वानखेडे यांना दिलं आहे. समीर वानखेडे आणि इतर काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आर्यन खान याचं समुपदेशन करण्यात आलं. त्यावेळी आर्यननं वानखेडे यांना वचन दिलं आहे.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो