Aryan Khan Drugs Case: ड्रग्स केसवरून आर्यन खान संतापला, म्हणाला - तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 13:57 IST2022-06-11T13:57:01+5:302022-06-11T13:57:20+5:30
Aryan Khan On Drugs Case: आता एनसीबी डेप्युटी डायरेक्टर जनरल संजय सिंह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत आर्यन खानच्या वक्तव्याचा खुलासा केला आहे.

Aryan Khan Drugs Case: ड्रग्स केसवरून आर्यन खान संतापला, म्हणाला - तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय..
Aryan Khan On Drugs Case: बॉलिवूड किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स केसमधून निर्दोष सुटला आहे. 2 ऑक्टोबर 2021 ला किंग खानचा मुलगा आर्यन याला ड्रग्स केसमध्ये अटक केली होती. काही आठवडे त्याला तुरूंगात घालवावी लागली. तो तुरूंगातून बाहेर आल्यापासून शाहरूख खान आणि त्याच्या परिवाराने यावर काहीच वक्तव्य केलं नव्हतं. पहिल्यांदाच आर्यन खान याने यावर व्यक्त केलेलं मत समोर आलं आहे.
आता एनसीबी डेप्युटी डायरेक्टर जनरल संजय सिंह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत आर्यन खानच्या वक्तव्याचा खुलासा केला आहे. संजय खान यांनी सांगितलं की, ते ड्रग्स केसबाबत आर्यन खानसोबत बोलण्यासाठी गेले होते. तेव्हा आर्यन खान बिनधास्तपणे याबाबत बोलला आणि म्हणाला की, मी लायक होतो का?
आर्यन खान पहिल्यांदा ड्रग्स केसबाबत संजय सिंहला म्हणाला होता की, 'सर, तुम्ही मला इंटरनॅशनल ड्रग्स तस्कर बनवलं. मी ड्रग्समध्ये पैसे लावतो. ह आरोप खोटे नाहीत का? त्यांना माझ्याकडे ड्रग्स सापडलं नाही. तरीही त्यांनी मला अटक केली. सर, तुम्ही माझ्यासोबत फार चुकीचं केलं आणि माझी प्रतिष्ठा मातीत मिळवली. मला इतके दिवस तुरूंगात का घालवावे लागले? खरंच हे मी डिझर्व करतो का?. संजय सिंह असेही म्हणाले की, शाहरूख खान त्यांना रडत म्हणाला होती की, लोक त्याला राक्षस म्हणून चित्रित करतात. पण तो आणखी मजबूत होत आहे.
दरम्यान, ड्रग्स केसप्रकरणी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्लीन चिट देण्यात आली आहे. एनसीबीने आपल्या चार्जशीटमध्ये लिहिलं आहे की, आर्यन खान विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. म्हणजे एनसीबीला आर्यन खानने ड्रग्स घेतल्याचे किंवा त्याच्याकडे ड्रग्स असल्याचे पुरावे सापडले नाहीत.