शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आर्यनला तुरुंग प्रशासनाकडून मिळाले ९,७५० रुपये, यामागचं कारण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 17:30 IST

Aryan Khan : कारागृहातून सुटका होण्यापूर्वी आर्यन खानला तुरुंग प्रशासनाकडून काही पैसे देण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टीवरून एनसीबीने (NCB) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. २६ दिवसांनी आर्यन खान याची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. गुरुवारी आर्यन खानला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पूर्ण झाली. मात्र जामिनाची प्रत तुरुंगात वेळेवर पोहोचली नसल्यानं आर्यनला ती रात्र तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर शनिवारी आर्यन खानची कारागृहातून सुटका झाली आहे. कारागृहातून सुटका होण्यापूर्वी आर्यन खानला तुरुंग प्रशासनाकडून काही पैसे देण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे.

आर्थर रोड कारागृहाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वी आर्यन खानला तुरुंग प्रशासनाने ९ हजार ७५० रुपये परत केले आहेत. आर्यन खानने आर्थर रोड जेलमध्ये एकूण पाच हजार अडीचशे रुपये खर्च केले. त्यामुळे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी तुरुंग प्रशासनाने शिल्लक रक्कमेची मोजणी करुन आर्यनला ९ हजार ७५० रुपये परत केले. तुरुंगात असताना आर्यन खानला त्याच्या कुटुंबीयांकडून १५ हजार रुपये मनीऑर्डर देण्यात आली होती.

कारागृहातील कूपन सिस्टम बंद झाली आहे. त्यामुळे सध्या कोणत्याही कैद्याला त्याच्या कुटुंबाकडून केवळ मनी ऑर्डर केली जाते. या मनी ऑर्डरद्वारे मिळालेल्या पैशातून कोणताही कैदी कारागृहात असलेल्या कॅन्टीनमध्ये त्याच्या आवडीचे जेवण खाऊ शकतो.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानArthur Road Jailआर्थररोड कारागृहMONEYपैसाjailतुरुंगShahrukh Khanशाहरुख खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो