Aryan Khan Clean Chit: आर्यन खान सुटला, समीर वानखेडे अडकले; केंद्र सरकारकडून कारवाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 16:52 IST2022-05-27T16:51:34+5:302022-05-27T16:52:42+5:30
समीर वानखेडेंविरोधात आधीच खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी सुरु आहे. वानखेडेंविरोधात तेव्हा राष्ट्रवादीचे सध्या ईडीच्या ताब्यात असलेले नेते नवाब मलिक यांनी आरोप केले होते. हे प्रकरण खूप गाजले होते.

Aryan Khan Clean Chit: आर्यन खान सुटला, समीर वानखेडे अडकले; केंद्र सरकारकडून कारवाईचे आदेश
मुंबई कार्डिलिया क्रूझ ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्लिन चिट दिली आहे. आर्यन खान सुटला, पण आता त्याच्यावर कारवाई करणारे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे अडकले आहेत. समीर वानखेडेंविरोधात केंद्र सरकारने कारवाईचे आदेश दिले आहेत.
कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटक प्रकरणात आरोपपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाने वाढवून दिलेला ६० दिवसांचा अवधी या महिन्यात संपला. एनसीबीकडून आज पहिले आरोपपत्र सादर कोर्टात सादर करण्यात आलं. त्यात आर्यन खान आणि मोहककडे ड्रग्ज सापडले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या चार्जशीटमध्ये आर्यन खानचे नाव नाहीय. परंतू एनसीबीचे डीजी एस एन प्रधान यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून मोठी चूक झाली असल्याचे कबूल केले आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सरकारने समीर वानखेडेंवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास सांगितले आहे. आज तकला सुत्रांनी ही माहिती दिली आहे.
डीजी एस एन प्रधान यांनी म्हटले की, जर आधीच्या टीमने योग्यरितीने तपास केला असता तक एसआयटीकडून चौकशी केली गेली नसती. एसआयटीने केस हातात घेतली म्हणजे त्यांनी काहीतरी चुका केल्या असतील. या चुका दूर करण्यासाठी पुढील कारवाई करण्यात आली. सहा जणांविरोधात आम्हाला पुरावे सापडलेले नाहीत, अन्य १४ जणांकडे आम्हाला ड्रग्ज सापडले आहे. यामुळे त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. जर काही पुरावा सापडला तर केस पुन्हा ओपन केली जाऊ शकते, असेही ते म्हणाले.
याचबरोबर छापा मारल्यानंतर तपासावेळी झालेल्या चुकांच्या आरोपाखाली क्रूझवर छापा मारणाऱ्या एनसीबी आधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी सुरु केली जाऊ शकते, असेही ते म्हणाले.
समीर वानखेडेंविरोधात आधीच खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी सुरु आहे. वानखेडेंविरोधात तेव्हा राष्ट्रवादीचे सध्या ईडीच्या ताब्यात असलेले नेते नवाब मलिक यांनी आरोप केले होते. हे प्रकरण खूप गाजले होते. समीर वानखेडेंची अभिनेत्री पत्नीदेखील यात उतरली होती.