शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

NCB Arrested Aryan Khan: आर्यन खान प्रकरणात २५ कोटींचा बॉम्ब फुटला; समीर वानखेडेंना मिळणार होते ८ कोटी? मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 2:16 PM

Mumbai Cruise Rave Party: मुंबई क्रुझवर धाड टाकण्यापूर्वी किरण गोसावीला NCB कार्यालयाबाहेर सॅम डिसुझा नावाचा व्यक्ती भेटला होता असा नवा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकिरण गोसावी कुणासोबत तरी फोनवर बोलत होता. ज्यात २५ कोटींचा बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख होताछापेमारीवेळी सावधतेने काही व्हिडीओ आणि फोटो घेतले गेले. आर्यन खान प्रकरणात NCB ने किरण गोसावीला साक्षीदार बनण्यासाठी दबाव टाकला होता.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यनला NCB ने मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात(Mumbai Cruise Drugs Rave Party) अटक केली आहे. या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा सहकारी प्रभाकर साईल या घटनेला वेगळचं वळण दिलं आहे. NCB नं धमकावून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. किरण गोसावी गायब झाल्यापासून आपल्या जीवाला समीर वानखेडेंकडून धोका असल्याचं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर हा किरण गोसावीचा(Kiran Gosavi) बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारीपूर्वी गोसावीला कोऱ्या कागदावर सही करण्यासाठी मजबूर केले. क्रुझवर ड्रग्ज मिळाले की नाही याबाबत कल्पना नाही. परंतु या कोऱ्या कागदाचा वापर आर्यन प्रकरणात वापरण्यात आला. किरण गोसावी कुणासोबत तरी फोनवर बोलत होता. ज्यात २५ कोटींचा बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख होता. ही डील १८ कोटींमध्ये सेटल होणार होती. ज्यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना मिळणार होते. या संवादात शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानीकडून पैसे घेण्याचा उल्लेख होता. पूजा फोन उचलत नव्हती असंही संवादात म्हटलं गेले.

तर मुंबई क्रुझवर धाड टाकण्यापूर्वी किरण गोसावीला NCB कार्यालयाबाहेर सॅम डिसुझा नावाचा व्यक्ती भेटला होता. छापेमारीवेळी सावधतेने काही व्हिडीओ आणि फोटो घेतले गेले. एका व्हिडीओत स्पष्टपणे दिसत होतं की, गोसावीने ताब्यात घेण्यापूर्वी आर्यन खान कुणाशी तरी फोनवरुन संवाद साधत होता. या कारवाईमागे मोठं षडयंत्र असल्याचा संशय प्रभाकर साईलनं व्यक्त केला आहे.

NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

आर्यन खान प्रकरणात NCB ने किरण गोसावीला साक्षीदार बनण्यासाठी दबाव टाकला होता. साक्षीदाराला छापेमारीची माहिती कशी मिळू शकते. पंचनामा कारवाई आधीच केला होता. लोकांकडून सह्या घेतल्या होत्या. या कारवाईमागे तो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत गोसावीने आर्यनशी फोनवरुन बोलणं करुन दिलं होतं. या संवादानंतर आर्यनला ताब्यात घेण्यात आलं. प्रभाकरने सॅम नावाच्या व्यक्तीचा शोध घेण्याचं आवाहन केले आहे. ज्याला छापेमारीपूर्वी किरण गोसावी NCB कार्यालयाबाहेर भेटला होता. एनसीबीच्या क्रूझवरील कारवाईवेळी  एनसीबीचे अधिकारी, मी, किरण गोसावी आणि मनिष भानुशाली इतकेच उपस्थित होतो, अन्य कोणीही पंच उपस्थित नव्हते. माझ्या जीवाला धोका असल्याने सोलापूरला जाऊन राहिलो होतो. पंच असूनही आता कुटूंबीयांना धोका असल्याने  सर्व सत्य सांगत आहेत असं प्रभाकर साईलनं कबुली दिली.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो