शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अर्थेला म्हाळसादेवी, उंटावदला सुलाईमाता यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:44 IST

जय्यत तयारी : चैत्र पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम, मालपूरला व्यांघ्रबरीदेवी यात्रा 

ठळक मुद्देजय्यत तयारी : चैत्र पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम, मालपूरला व्यांघ्रबरीदेवी यात्रा 

शिरपूर/अर्थे : तालुक्यातील अर्थे बु. येथे म्हाळसादेवी तर उंटावद येथे सुलाई मातेचा यात्रोत्सव चैत्र शुध्द पौर्णिमेला भरत आहे.अर्थे- येथील म्हाळसादेवीच्या यात्रोत्सवाला चैत्र शुद्ध चर्तुदशीपासून  सुरुवात होत आहे. खानदेशातील भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येथे येतात. नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गर्दीने फुलून जातो. पंचक्रोशीतील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर ट्रस्टमार्फत जय्यत तयारी सुरू आहे. विश्वस्त मंडळाने मंदीर परिसरात अनेक सोयी भाविकाच्या देणगीतून उपलब्ध करुन दिल्या आहेत. विश्वस्त मंडळाने म्हाळसा देवीच्या मंदीराच्या बाजुला श्रीगणेश व महादेव मंदीराचे काम हाती घेतले आहे. ते पुर्णत्वाकडे आले आहे. या मंदीरांचा जिर्णोद्धार मे महिन्यात करण्यात येणार आहे. यात्रोत्सवाच्या पाशर््वभूमीवर मंदिराची सजावट करण्यात येत असून परिसराची साफसफाई करण्यात आली आहे. खाद्य पदार्थ, रसवंती, पूजेचे साहित्य, खेळणी, मनोरंजनासाठी पाळणे, संसारोपयोगी साहित्याची दुकाने, व्यावसायिकांनी थाटण्यास सुरुवात केली आहे. यात्रेनिमित्त लोकनाट्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. उंटावद- अरुणावती नदीच्या काठी असलेल्या उंटावद या गावी उत्तर महाराष्टÑातील एकमेव असे सुलाई मातेचे हे एक मंदिर आहे. १३ एकर जागेत सभामंडप २४०० चौरस फुट असून मंदिर ४२ बाय ४२ फुट आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची ६८ फुट असून २१ फुट उंच असलेल्या चार कॉलमवर हे मंदिर बांधण्यात आले आहे. सुलाई माता मंदिराचा गाभारात १३ बाय १३ फुट आहे. गाभाºयांपासून कळस ४८ फुट उंच आहे. या मंदिर परिसरात फळझाडे व वनराई यामुळे येथील नैसर्गिक वातावरण भाविकांना आल्हाददायक व पवित्र वाटते. जुने मंदिर हे ७०० वर्षापूर्वीचे असावे, असे सांगितले जाते. खानदेशातून भाविक मोठ्या श्रध्देने सुलाई मातेच्या दर्शनाला येतात व यात्रेचाही लाभ घेतात. शिरपूर शहरापासून अवघ्या २ किलोमिटर अंतरावर दक्षिणेला उंटावदला सुलाई मातेचे हे मंदिर आहे. १८ पासून यात्रोत्सवाला सुरूवात होत असून त्यादिवशी महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. या दिवशी किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवस यात्रा असते. आयोजकांनी येणाºया भाविकांची राहण्याची, पाण्याची सुविधा केली आहे. शिरपूर- वरवाडे भागातील म्हाळसादेवी मंदिरातही चैत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. महाआरती, पूजा पठण आदी कार्यक्रम आहेत. दक्षिणात्य पध्दतीचे मंदिर असून ते भाविकांना आर्कषित करणारे आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मालपूर- शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे चैत्र शुद्ध चतुर्दशी १८ पासून ग्रामदैवत व्यांघ्रबरी देवीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. अमरावती नदी काठावर तळघरात हे मंदिर आहे. चैत्र शुद्ध चतुर्दशीला येथे ६० दिव्यांची आरती लावण्याची प्रथा आहे. येथे राज्यासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. १८ व २० तारखेला मनोरंजनासाठी लोकनाट्य कार्यक्रम आयोजित केला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे