तहसीलदार कार्यालयातील कारकुनास लाच घेताना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 09:27 PM2019-10-04T21:27:05+5:302019-10-04T21:28:29+5:30

30 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली.

Arrested for taking bribe from clerk of tehsildar office | तहसीलदार कार्यालयातील कारकुनास लाच घेताना अटक 

तहसीलदार कार्यालयातील कारकुनास लाच घेताना अटक 

Next
ठळक मुद्दे तक्रारीच्या अनुषंगाने आज दुपारी सापळा रचण्यात आल्यावर लाचेच्या रक्कमे पैकी 30 हजाराचा पहिला हप्ता घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालीत त्यांना अटक केली. कुळ वाहिवाटीच्याप्रमाणे दाखल दाव्याच्या निकालाची प्रत मिळविण्यासाठी अव्वल कारकून मेहेर ह्यांनी 60 हजाराची लाचेची मागणी केली

पालघर - पालघर तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून प्रशांत मेहेर व त्याच्या सहकाऱ्याला 30 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली.
बोईसर येथील तक्रारदार असलेल्या व्यक्तीच्या कुळ वाहिवाटीच्याप्रमाणे दाखल दाव्याच्या निकालाची प्रत मिळविण्यासाठी अव्वल कारकून मेहेर ह्यांनी 60 हजाराची लाचेची मागणी केली होती. ह्या प्रकरणी तक्रारदारांनी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपअधीक्षक के.हेगाजे व पोनि.भारत साळुंखे ह्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. ह्या तक्रारीच्या अनुषंगाने आज दुपारी सापळा रचण्यात आल्यावर लाचेच्या रक्कमे पैकी 30 हजाराचा पहिला हप्ता घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालीत त्यांना अटक केली. ह्या प्रकरणात सहभागी असलेल्या त्याच्या कार्यालयातील सहकारी हसमुख राऊत ह्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

Web Title: Arrested for taking bribe from clerk of tehsildar office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.