शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

दिल्लीतून सोने घेऊन पसार झालेल्याला अटक; ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 4:21 AM

नागपूर येथील बँकेतील खात्यातूनही ऑनलाइन २५ लाखांची फसवणूक

ठाणे : नवी दिल्ली येथील सराफाचा विश्वास संपादन करून दोन किलोच्या सोन्याचे बार एका सराफाकडून घेतल्यानंतर त्याच्या बँक खात्यात पैसे वळते करण्याचा बहाणा करून पसार झालेल्याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी अटक केली.

गुजरात येथील वजय सोनी (५०, रा. वरादगाव, जि. सिल्होड, गुजरात) याने नवी दिल्लीतील बिडनपूर येथे ‘शुभम गोल्ड अ‍ॅण्ड सिल्व्हर’ या नावाने तीन महिन्यांपूर्वी ज्वेलर्सचे दुकान सुरू केले होते. त्याने व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केला होता. अशाच प्रकारे२६ आॅक्टोबर २०१९ रोजी कृष्णदेव खुपकर (रा. करोलबाग, नवी दिल्ली) यांना त्याच्या दुकानात ८५ लाखांचे दोन किलो सोन्याच्या बारसह त्याने बोलावून घेतले. हे सोने त्याने स्वत:च्या ताब्यात घेऊन खुपकर यांना त्याच्या दुकानात बसवून ठेवले. बँकेत जाऊन पैसे तुमच्या खात्यात वळते करतो, असे सांगून साथीदार बंटी उर्फ लक्की याच्यासह निघून पसार झाला. त्याचा मोबाइलही बंद करून ठेवला. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मूळचे महाराष्ट्रातील सांगलीतील विटा येथील रहिवासी असलेल्या खुपकर यांनी त्याच्याविरुद्ध करोलबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ही कैफियत खुपकर यांनी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे ७ फेब्रुवारी २०२० रोजी मांडली होती. त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच खबऱ्यांच्या मदतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने शोध घेतला. त्याच माहितीच्या आधारे त्याला १० मार्च रोजी दुपारी १२च्या सुमारास विजय सोनी उर्फ विजय मगनलाल झवेरी याला ठाण्यातील मासुंदा तलाव भागातून पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध बोईसर आणि सुरत येथेही गुन्हे दाखल आहेत.अनेक गुन्ह्यांमध्ये वॉण्टेडदिल्लीतील दोन किलो सोने अपहार प्रकरणात तो वॉण्टेड होता. तसेच नागपूर येथेही त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. तर लोकमान्य टिळक मार्ग येथील फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता. त्याला आता दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बोईसर येथेही फसवणुकीचा गुन्हा दाखल असून या प्रकरणातही त्याने ठाणे कारागृहात दोन वर्षे शिक्षा भोगली आहे. तर गुजरातला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. या प्रकरणात तो जामिनावर सुटला आहे.

टॅग्स :Arrestअटकfraudधोकेबाजी