धामण सापांची हत्या करून समाजमाध्यमावर व्हिडिओ टाकणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 19:31 IST2020-07-06T19:31:35+5:302020-07-06T19:31:42+5:30
ही घटना आठ दिवसापूर्वी घडली होती.तळावली नावेली येथील फ्लावियानो दिनीज याने नावेली येथील एका शेतात हे धामण साप प्रियराधान करताना दिसले.

धामण सापांची हत्या करून समाजमाध्यमावर व्हिडिओ टाकणारा अटकेत
मडगाव: मिलनोसूक्त अवस्थेत असलेल्या दोन धामण सापांची हत्या करून आपला हा पराक्रम समाजमाध्यमावर व्हिडीओ रुपात अपलोड करणे एकाला भारी पडले असून या व्हिडीओची वन खात्याने दखल घेत त्याला अटकही केली .
वास्तविक ही घटना आठ दिवसापूर्वी घडली होती.तळावली नावेली येथील फ्लावियानो दिनीज याने नावेली येथील एका शेतात हे धामण साप प्रियराधन करताना दिसले. दिनीज याने त्यांना काठीने झोडपून मारले . त्यानंतर स्कूटरला त्या दोन्ही मृत सापांना बांधून त्यांना फरफटत ओढून नेले होते.
या घटनेचा विडिओ शूट करून तो समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. याच व्हायरल व्हिडीओची वन खात्याने त्वरित दखल घेत सोमवारी त्याला अटक केली. त्याच्या अन्य चार साथीदारांनाही ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या मृत सापांना ओढत नेण्यासाठी ज्या सकूटरचा वापर करण्यात आला होता तीही जप्त करण्यात आल्याची माहीती वन अधिकाऱ्यानी दिली