नवी मुंबई - किराणा बाजार व दुकाने मंडळ बोर्डाचा सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी मंगेश झोले याला गुरुवारी दोन लाखांची लाच घेताना अटक केली आहे. त्याने न्यायालयात सोयीप्रमाणे अहवाल सादर करण्यासाठी ७ लाखांची लाच मागितली होती.किराणा बाजार मंडळाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या एका टोळीतील सभासद कामगारांच्या नेमणुक आदेशाविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात हवा तसा अहवाल सादर करण्यासाठी मंगेश झोले याने ७ लाखांची लाच मागितली होती. याबदल्यात न्यायालयात संबंधित टोळीला हवा तसा अहवाल देणार व न्यायालयाने विरोधात निकाल दिला तर पुन:परीक्षण करून तपासणी अहवाल तक्रारदारच्या बाजूने देण्याचे मान्य केले होते. सुरुवातीला सात लाख रुपये मागितले. तडजोडीअंती ६ लाख निश्चित करण्यात आले. गुरुवारी २ लाख रुपये स्वीकारताना अटक केली आहे. लाचलुचपत विभागाचे ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीच्या मालमत्तेचाही तपास केला जात आहे.
माथाडी बोर्डाच्या सचिवाला लाच घेताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 02:49 IST