Arrested criminals who threaten to kill him after demanding extortion amount | खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक
खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

ठळक मुद्देएका हॉटेलच्या मॅनेजरला एका इसमाने २५ हजार खंडणीची मागणी करत शिवीगाळ केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या आरोपीचे नाव सचिन उर्फ बाबू शंकर मोहिते (३७) असं असून त्याच्याविरोधात खंडणी, खून, मारहाण आणि दंगलीचे किमान ५ गुन्हे पवई पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

मुंबई - खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत  आरोपीस गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने अटक केली आहे. २५ मे रोजी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलच्या मॅनेजरला एका इसमाने २५ हजार खंडणीची मागणी करत शिवीगाळ केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून त्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष १० कडे सोपविण्यात आला. त्यानुसार गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपास करत आरोपीचा शोध सुरु केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी स्वतःची ओळख लपून बसला होता. २६ मे रोजी कक्ष १० च्या पोलिसांना आरोपी मरोळ परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार त्याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपीचे नाव सचिन उर्फ बाबू शंकर मोहिते (३७) असं असून त्याच्याविरोधात खंडणी, खून, मारहाण आणि दंगलीचे किमान ५ गुन्हे पवई पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  


Web Title: Arrested criminals who threaten to kill him after demanding extortion amount
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.