शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन पध्दतीने परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 19:07 IST

परदेशातील नागरिकांना फोन करून त्यांना ऑनलाइन गंडा घालणाऱ्या खराडी भागातील एका कॉलसेंटरवर शुक्रवारी पहाटे छापा टाकण्यात आला.

पुणे : परदेशातील नागरिकांना फोन करून त्यांना ऑनलाइन गंडा घालणाऱ्या खराडी भागातील एका कॉलसेंटरवर शुक्रवारी पहाटे छापा टाकण्यात आला. तेथील चौघांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.    शालीन बिपीन पंचाल, धनंजय बिपीनभाई पंचाल (दोघे, रा. दर्शन अपार्टमेंट, अहमदाबाद, गुजरात), निसर्ग सुभाष पंडीत (रा. सहारा एनक्लेव्ह, विमाननगर, मूळ रा. नवदुर्गा सोसायटी, पाटण, गुजरात), मितेश गोकुल ठक्कर (रा. हरिओम व्हिला, अहमदाबाद, गुजरात), ऐश्वर्य मोहन भारद्वाज (रा. साई कृष्णा अपार्टमेंट, भाईंदर) यांना अटक करण्यात आली. या कारवाईत हार्डडिस्क, लॅपटॉप, हेडफोन, डेबिट कार्ड, मोबाइल  तसेच अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी खराडी-चंदननगर भागातील एका कॉलसेंटरमधून परदेशातील नागरिकांची ऑनलाइन फसवणुक करण्याचे प्रकार केले जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे यांना मिळाली. त्यानंतर पहाटे प्राईड आयकॉन सोसायटीत असलेल्या सदनिकेवर छापा टाकण्यात आला. अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांची माहिती हार्डडिस्कवर साठविण्यात आली होती. पोलिसांनी या कारवाईत २५ हार्ड डिस्क, १४ लॅपटॉप तसेच आय ट्युन कार्ड जप्त केले. प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्योतीप्रिया सिंह, गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त भानूप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, गजानन पवार, उपनिरीक्षक सागर पानमंद, किरण औटी आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकonlineऑनलाइन