शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची जमीन बालकावणाऱ्या पुरोहित बिल्डरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 21:39 IST

जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या किसन पुरोहित या बिल्डरला मीरारोड पोलीसांनी अटक केली आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ठळक मुद्देजमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या किसन पुरोहित या बिल्डरला मीरारोड पोलीसांनी अटक केली आहे. हेमप्रकाश यांनी सदर वचनचिठ्ठी बनावट असून त्यातील सह्या देखील खोट्या असल्याचे सांगत तशी तक्रार केली होती.

मीरारोड - शेतकऱ्यांनी आपल्याला जागा विक्री करायचे निश्चित केल्याची बनावट वचनचिठ्ठी बनवून जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या किसन पुरोहित या बिल्डरला मीरारोड पोलीसांनी अटक केली आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.हिराजी पाटील यांच्या कुटुंबाची मीरारोडच्या कनकिया भागातील आयुक्त बंगल्यामागे सुमारे १०० गुंठे इतकी जमीन आहे. या जमीन ही इमामुद्दीन शेख याने खोट्या कागदपत्रांद्वारे बळकावण्याचा प्रयत्न केल्याने त्या विरोधात हेमप्रकाश पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन इमामुद्दीन याला अटक झाली. याच दरम्यान किसन पुरोहित याने या जमीन शेतकऱ्यांनी आपणास विकण्याचे मान्य केल्याचे सांगत हेमप्रकाश सह त्याचे अन्य दोन भाऊ, दोन बहिणी व आई यांच्या सह्या असल्याची वचनचिठ्ठी न्यायालयातील एका दाव्यात सादर केली होती. हेमप्रकाश यांनी सदर वचनचिठ्ठी बनावट असून त्यातील सह्या देखील खोट्या असल्याचे सांगत तशी तक्रार केली होती.मीरारोड पोलीसांनी अखेर या प्रकरणी पुरोहित विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्यजित कस्तुरे यांनी शुक्रवारी रात्री पुरोहित याला अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुरोहित याच्या अटकेने पुन्हा एकदा शहरातील शेतकरयांना त्यांच्या जमीनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFarmerशेतकरी