श्रीरामपुरातील अर्जुन दाभाडे स्थानबद्ध, एमपीडीएची कारवाई
By शिवाजी पवार | Updated: October 9, 2023 18:14 IST2023-10-09T18:12:32+5:302023-10-09T18:14:08+5:30
श्रीरामपूरसह सोनई, नगर तालुका, गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अर्जुन दाभाडे याच्याविरोधात ७ गुन्हे दाखल आहेत.

श्रीरामपुरातील अर्जुन दाभाडे स्थानबद्ध, एमपीडीएची कारवाई
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : वाळू चोरी व सार्वजनिक सुव्यवस्था बिघडविणाऱ्या श्रीरामपूर येथील अर्जुन खुशाल दाभाडे याला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या आदेशानुसार एमपीडीए अन्वये नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील वाळू तस्करीला लगाम बसणार आहे.
श्रीरामपूरसह सोनई, नगर तालुका, गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अर्जुन दाभाडे याच्याविरोधात ७ गुन्हे दाखल आहेत. दाभाडे याने सराईतपणे गुन्हे करून गैरकायद्याची मंडळी जमवून घातक शस्त्र व अग्निशस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेस बाधा आणणारे कृत्य केलेली आहेत.
दरोड्याचा प्रयत्न, साथीदारांसह वाळू चोरी करणे असे सार्वजनिक सुरक्षिततेस बाधा अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीएचा प्रस्ताव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सादर केला होता.