शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Video : पालिका अधिकाऱ्याशी हुज्जत घालणं पडलं महागात; संदीप देशपांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 15:17 IST

याबाबत शिवाजी पार्क पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतले आहे. 

ठळक मुद्देपालिकेच्या सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या हुज्जत घालत जाब विचारला. महापालिकेने हे कंदिल अनधिकृत असल्याचं सांगत कारवाई करत सर्व कंदिल काढले आणि त्यांना केराची टोपली दाखवली.

मुंबई - दादर-माहिम परिसरात मनसेने दिवाळी निमित्त शुभेच्छा देणारे कंदिल मनसेचे विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी लावलेले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो, अमित ठाकरे यांचं नाव होतं. दरवर्षीप्रमाणे मनसेने हे कंदील लावले होते आणि तुळशीच्या लग्नानंतर ते काढलेही जातात. मात्र, यावेळी महापालिकेने हे कंदिल अनधिकृत असल्याचं सांगत कारवाई करत सर्व कंदिल काढले आणि त्यांना केराची टोपली दाखवली. त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्क सीफेस परिसरात पाहणीसाठी गेलेल्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या हुज्जत घालत जाब विचारला. याबाबत शिवाजी पार्क पोलिसांनीसंदीप देशपांडे यांना ताब्यात घेतले आहे. 

मनसेचे कंदिल हटवण्याची कारवाई करताना महापालिकेला शिवसेनेने विभागात लावलेले कंदिल आणि झेंडे दिसले नाहीत का, असा खडा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.तसेच, मनसेला टार्गेट केल्या जात असल्याचे देशपांडे म्हणाले. हे पक्षीय राजकारण आम्ही सहन करणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिघावकर यांना दिला. मनसेच्या कंदिलांवरून महापालिकेच्या कारवाईनंतर दादर-माहिम मधलं राजकीय वातावरण तापलेलं आहे.या घटनेनंतर संदीप देशपांडे यांच्याविरोधात दिघावकर यांनी शिवाजी पार्क पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषा वापरल्याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी कारवाई करत संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतलं आहे. 

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेPoliceपोलिसcommissionerआयुक्तMuncipal Corporationनगर पालिका