शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

"केंद्रीय तपास यंत्रणा संसदेपेक्षा श्रेष्ठ आहेत का?"; उच्च न्यायालयाचा ED, CBIला सवाल

By दीप्ती देशमुख | Updated: September 14, 2022 19:02 IST

जामिनावर असलेल्या आरोपीविरोधात LOC जारी केल्याने ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आरोपीला अटक केल्यानंतर वेगवेगळ्या न्यायालयांनी त्याची जामिनावर सुटका करूनही केंद्रीय तपास यंत्रणांनी लुक आऊट सर्क्युलर (एलओसी) जारी केल्याने बुधवारी उच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर कोणत्या कायद्याअंतर्गत तुम्ही एलओसी जारी केलीत? असा सवाल न्या. अजय गडकरी व न्या. मिलिंद गडकरी यांच्या खंडपीठाने सीबीआय व ईडीला केला.

'जामीन मंजूर झाल्यानंतर, आरोपी जामीन मंजूर करणाऱ्या न्यायालयाच्या ताब्यात असतो. तुम्ही ( सीबीआय, ईडी) अशा न्यायिक आदेशांना बाजूला कसे सारू शकता?  तुम्ही संसदेपेक्षा श्रेष्ठ आहात का?' अशा शब्दांत न्यायालयाने सीबीआय व ईडीवर ताशेरे ओढले. सीबीआयच्या विनंतीवरीन गृहमंत्रालयाने जारी केलेल्या एलओसीला येस बँकेचे संस्थापक राणा कपूर याची मुलगी रोशनी कपूर हिने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. डीएचएफएल आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी  सीबीआय व ईडीने रोशनीची चौकशी केली आहे. या आर्थिक गैरव्यवहाराच्या कटात रोशनीही सामील असल्याचा आरोप सीबीआय व ईडीने केला आहे.

रोशनीने केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, अटक केलेल्या आरोपीविरोधात एलओसी जारी करून तपास यंत्रणांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. 'लूक आऊट नोटीस फरारी आरोपींसाठी असते. एकदा का आरोपीला अटक केले की नोटीस रद्दबातल ठरते, असे न्या. गडकरी यांनी म्हटले. जामिनावर असतानाही आरोपी फरार होऊ नये, यासाठी एलओसी जारी केल्याचे सीबीआय व ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, रोशनीही जामिनावर सुटका करतानाच न्यायालयाने तिला पासपोर्ट सीबीआयकडे जमा करण्याचे आदेश दिले. ती न्यायालयाच्या परवानगीनेच काही दिवस परदेशात गेली होती, असे रोशनीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

'कायदेशीर प्रक्रिया पार न पाडताच फरारी होणाऱ्या आरोपीला रोखणे, हा यामागचा हेतू आहे. पण सदर प्रकरणी योग्य जामीन अटी घालण्यात आल्या आहेत. तुम्ही (सीबीआय, ईडी) बनून कायद्यापेक्षा वरचढ ठरू शकत नाही,' अशा शब्दांत न्यायालयाने तपास यंत्रणांना फटकारले. आरोपीच्या परदेशात जाण्याच्या अर्जाला विशेष न्यायालयात आव्हान द्या. आमचा वेळ वाया घालवू नका, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागMumbaiमुंबई