शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

आर्किटेक्ट निमगडे हत्येच्या कटाचा उलगडा; कुख्यात सफेलकर टोळीने ५ कोटींची घेतली सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 21:34 IST

Architect Eknath Nimgade murder mystry : मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशमधून बोलविले शुटर; १४ आरोपींचा समावेश, सूत्रधारांसह सहा फरार

ठळक मुद्देसुपारी घेतल्यानंतर सफेलरकर, हाटेने नब्बूला प्रारंभी २० लाख, नंतर १ कोटी आणि नंतर ५० लाख दिल्याचे उघड झाले आहे.

नागपूर : तपास यंत्रणांसाठी आव्हान ठरलेल्या आर्किटेक्ट एकनाथ निमगडे मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यात शहर पोलिसांनी अखेर यश मिळवले. नागपुरातील गँगस्टर रंजित सफेलकर याने ५ कोटी रुपयांची सुपारी घेऊन कुख्यात नब्बूच्या भाडोत्री गुंडांकडून निमगडेंची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकारांनी ही माहिती दिली.

उल्लेखनीय म्हणजे, लोकमतने सोमवारी १५ मार्चच्या अंकात ‘आर्किटेक्ट एकनाथ निमगडे मर्डर मिस्ट्रीचा उलगडा’ करण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित केले होेते. पत्रकार परिषदेदरम्यान लोकमतच्या या वृत्ताचीही जोरदार चर्चा झाली. वर्धा मार्गावरील सुमारे दोनशे कोटींच्या जमिनीचा साैदा १९८२ ला इंडियन सिटिझन वेलफेअर मल्टिपर्पज सोसायटीसोबत निमगडे यांनी ३३ लाखात केला होता. पैशाचा व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे जमिनीचा वाद वाढला. नंतर ५० कोटींच्या या जमिनीची किंमत दोनशे ते अडीचशे कोटीत गेल्याने हा वाद सुटण्याऐवजी चिघळतच गेला. या पार्श्वभूमीवर, ६ सप्टेंबर २०१६ ला एकनाथ निमगडे गांधीबाग गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकला गेले. सकाळी ७ च्या सुमारास ते त्यांच्या मोपेडने घराकडे येत असताना अचानक काळ्या रंगाच्या मोपेडवर तोंडाला स्कार्फ बांधलेल्या तरुणाने त्यांना लाल इमली मार्गावर अडविले आणि देशीकट्ट्यातून बेछूट गोळीबार करून निमगडे यांची हत्या केली. या हत्याकांडाने नागपूरच नव्हे तर त्यावेळी राज्यभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी शहरातील संतोष आंबेकर, दिवाकर कोतुलवारसह बहुतांश बड्या गुन्हेगारांची कसून चौकशी केली होती. मात्र, पोलिसांना मारेकरी शोधण्यात यश आले नसल्याने अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. मात्र, तीन वर्षे तपास करूनही सीबीआयला प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले नव्हते. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तांनी अनडिटेक्ट मर्डर चा छडा लावण्यासाठी शहरातील १० हजारांपेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेणे सुरू केले. त्यातून निमगडे हत्याकांडाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. तपास सीबीआयकडे असल्याने पोलिसांनी आपल्या पद्धतीने या गुन्ह्यातील एकेका गुन्हेगाराला वेगवेगळ्या पद्धतीने बोलते केले अन् हत्याकांडाच्या कड्या जुळविल्या. त्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार, कामठी, नागपूरचा गँगस्टर रणजीत सफेलकर याने निमगडेंची हत्या करण्यासाठी पाच कोटींची सुपारी घेतल्याची माहिती पुढे आली. कुख्यात सफेलकरचा राईट हॅण्ड कालू उर्फ शरद हाटे याने जुलै २०१६ मध्ये उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड नब्बू उर्फ नवाब छोटे साहाब याला ही सुपारी दिली.

सिनेस्टाईल झाला गेमनब्बूने मोशू उर्फ मुस्ताक अशरफी, शहबाज, अफसर, फिरोज यांना सोबत घेऊन राजा उर्फ पीओपी, बाबा (दोघेही रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश), परवेज (आजमगड, उत्तरप्रदेश) या शूटर्सना बोलविले. तत्पूर्वी नब्बूने आपल्या साथीदारांच्या मदतीने निमगडे यांची अनेक दिवस रेकी केली. ठरल्याप्रमाणे १६ सप्टेंबर २०१६ च्या सकाळी राजा, बाबा आणि परवेज तीन पिस्तुलं घेऊन एका दुचाकीवर निमगडेंचा पाठलाग करू लागले. कुख्यात नब्बू यांना मॉनिटर करीत होता. लाल ईमली गल्लीत संधी मिळताच उपरोक्त तिघांनी बेछुट गोळ्या झाडून निमगडेंची हत्या केली आणि शहरातून पसार झाले.सुपारीवरून वादसुपारी घेतल्यानंतर सफेलरकर, हाटेने नब्बूला प्रारंभी २० लाख, नंतर १ कोटी आणि नंतर ५० लाख दिल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, १ कोटी, २० लाख घेतल्यानंतरही निमगडेंची हत्या करण्यास मागेपुढे पाहत असल्याने कालू हाटेने नब्बूला मारहाण केली होती. त्यानंतर नब्बू अॅक्टीव्ह झाला आणि त्याने शुटर्सना बोलवून हे हत्याकांड घडवून आणले. या हत्याकांडात एकूण १४ आरोपी असून त्यातील ९ जण ताब्यात तर मुख्य सूत्रधार सफेलकर, हाटे आणि नब्बू, परवेजसह ५ आरोपी फरार असल्याचेही अमितेशकुमार यांनी सांगितले.सीबीआयचे पथक दाखलया हत्याकांडाचा छडा लागल्याची माहिती अमितेशकुमार यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना कळविली. त्यानुसार, सीबीआयचे पथक नागपुरात दाखल झाले. तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर टप्प्यात असलेल्या आरोपींना ते अटक करणार आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा गुन्हा शोधून काढण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचेही आयुक्तांनी सांगितले.यूपी एसटीएफशी संपर्कसुपारी किलर राजा पीओपी आजमगडचा रहिवासी आहे. त्याला शोधून काढण्यासाठी युपी एसटीएफलाही माहिती देण्यात आली आहे. तर, नब्बू आणि सफेलकर तसेच हाटे यांचा आग्रासह ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे. सफेलकर-हाटे टोळीने मनीष श्रीवास नामक गुंडाची हत्या करून तंदूरच्या भट्टीत त्याचे शव जाळले आणि नंतर ती राख नदीत शिरवल्याचाही आरोप आहे. पोलीस त्या गुन्ह्यातही या दोघांचा शोध घेत आहे. त्यांना अटक केल्यानंतर ही सुपारी कुणी दिली त्याचा उलगडा होणार आहे.पाच लाखांचे बक्षीसया हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी जो मदत करेल, त्याला सीबीआयने पाच लाख रुपये पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. हा पुरस्कार गुन्हे शाखेतील २३ जणांना दिला जाणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसnagpurनागपूरArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेशUttar Pradeshउत्तर प्रदेश