क्रिकेट खेळण्यावरूनच्या भांडणातुन मारहाण अन् वार; ४ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 04:34 PM2021-10-19T16:34:35+5:302021-10-19T16:34:41+5:30

क्रिकेट वरून झालेल्या भांडणाची चर्चा सुरु झाली असतांना अचानक रोहीत याने कल्पेशला मारायला सुरवात केली.

Anwar beaten up over quarrel over playing cricket; Charges filed against 4 persons in mira-bhayendar | क्रिकेट खेळण्यावरूनच्या भांडणातुन मारहाण अन् वार; ४ जणांवर गुन्हा दाखल

क्रिकेट खेळण्यावरूनच्या भांडणातुन मारहाण अन् वार; ४ जणांवर गुन्हा दाखल

Next

मीरारोड - क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या किरकोळ भांडणाचे पर्यवसान भाईगिरीच्या नादामुळे मारहाण व शास्त्राने वार करण्या पर्यंत पोहचले. भाईंदरच्या नवघर पोलिसांनी सोमवारी चौघां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मीरारोडच्या गार्डन सिटी समोर तनुसिंग देवडा , रघुविर सिंग, जितेंन्द्र सिंग व कल्पेश जानी हे एकत्र बसले असताना कल्पेशला रोहीत नावाच्या तरुणाचा फोन आला . सकाळी क्रिकेट खेळताना झालेला वाद एकत्र बसून मिटवू असे रोहितने सांगितल्याने कल्पेश सह अन्य तिघे भाईंदर पूर्वेच्या महात्मा फुले ( केबिन रोड ) मार्गावर रोहितला भेटण्यास रात्री १० च्या सुमारास गेले. तेथे रोहित सहसुप्रीत,विक्रम,अमन उपस्थित होते .

क्रिकेट वरून झालेल्या भांडणाची चर्चा सुरु झाली असतांना अचानक रोहीत याने कल्पेशला मारायला सुरवात केली. तनुसिंग मध्ये पडला असता त्याला सुद्धा मारहाण केली व सुप्रीत याने त्याचे हातातील धारदार शस्त्रासारखे दिसणारे हत्याराने तनुच्या पाठीत वार केला . रोहित व त्याच्या साथीदारांनी तनु , कल्पेश व अन्य दोन मित्रांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारले . त्यात तनुची गळ्यातील सोनसाखळी पडून गहाळ झाली .

Web Title: Anwar beaten up over quarrel over playing cricket; Charges filed against 4 persons in mira-bhayendar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.