शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामींसह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 06:26 IST

Anvay Naik suicide case: अर्णब गोस्वामींना आज सकाळी ७ वाजता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली.

रायगड : अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अर्णब गोस्वामींना आज सकाळी ७ वाजता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली. अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर अन्वय नाईक यांच्या चिठ्ठीत नावे असलेले फिरोज शेख, नितेश सारडा यांनाही पोलिसांनी सायंकाळी अटक केली. यानंतर या तिघांनाही रायगडच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सकृत दर्शनी पुरावा आढळला नाही. त्यामुळे सरकार पक्षाची पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आणि अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात आज अर्णब गोस्वामी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत.

 

दरम्यान, २०१८ मध्ये इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील घरी आत्महत्या केली होती, त्यांच्या मृतदेहाशेजारी अन्वय नाईक यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. याठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक बाबींमुळे आत्महत्या केल्याचे उघड झाले. मात्र या पत्रात अर्णब गोस्वामी यांचाही उल्लेख करण्यात आला होता. अलीकडेच ठाकरे सरकारने या प्रकरणाची चौकशी पुन्हा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याप्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक केली. अन्वय नाईक यांच्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांनी 83 लाख, फिरेज शेख यांनी 4 कोटी, नितेश सारडा यांनी 55 लाख रुपये थकविल्याचे म्हटले होते. ही चिठ्ठी अन्वय नाईक यांच्या मुलीने आज पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना दिली. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीAnvay Naikअन्वय नाईक