शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Antilia Bomb Scare: स्कॉर्पिओ चालक पळून गेलेली ती इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच; एनआयएचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 14:37 IST

Sachin Vaze arrested, Mansukh hiren case: अँटिलाया परिसरात दोन गाड्या आल्या होत्या. त्यापैकी एक जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ आणि दुसरी इनोव्हा कार होती. ड्रायव्हरने स्कॉर्पिओ तिथे पार्क करून इनोव्हा गाडीतून पळ काढला होता.

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवून ज्या इनोव्हातून त्या ड्रायव्हरने पळ काढला होता ती इनोव्हा मुंबई पोलिसांचीच असल्याचे समोर येत आहे. एनआयएने इनोव्हा गाडीचे कोडे सोडविल्याचा दावा केला आहे. (Innova belongs to Mumbai police crime Branch, headed towards Thane.)

अँटिलाया परिसरात दोन गाड्या आल्या होत्या. त्यापैकी एक जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ आणि दुसरी इनोव्हा कार होती. ड्रायव्हरने स्कॉर्पिओ तिथे पार्क करून इनोव्हा गाडीतून पळ काढला होता. मुंबईहून बाहेर जाणाऱ्या मुलुंड टोलनाक्यावर त्या इनोव्हामध्ये दोन व्यक्ती असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले होते. ही इनोव्हा कोणाची होती याचा तपास सुरु होता. यावर आता एनआयएच्या सुत्रांनी खळबळजनक माहिती उघड केली आहे. 

ही इनोव्हा कार मुंबई क्राईम ब्रांचचीच होती. त्यामध्ये स्कॉर्पियो कारचा मालक मनसुख हिरेन होता. अँटिलिया केसध्ये मुंबई पोलिसांचा आणखी एक अधिकारी रियाज काझी याला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे. 

Sachin Vaze Arrested : स्फोटकांची कार लावण्यात सचिन वाझेंचा थेट सहभाग; NIAचे गंभीर आरोप

सुत्रांनुसार या प्रकरणात दोन वाहने वापरली होती. स्कॉर्पिओ कारच्या मागे इनोव्हा कार जात होती. मुंबईच्या मुलुंड टोलनाक्यावर ही कार दिसली. चेंबूर भागात इनोव्हा आणि स्कॉर्पिओ आणि इनोव्हा कार एकत्र आल्या. त्यानंतर दोन्ही कार या अँटिलियाच्या दिशेने कार्मायकल रोडवर गेल्या. स्कॉर्पिओ तिथेच सोडून ही इनोव्हा ठाण्याच्या दिशेने गेली. ठाण्यामध्ये प्रवेश करताना ही कार पाहिली गेली. यानंतर इनोव्हा कुठेच दिसली नव्हती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत या कारचा उल्लेख केला होता. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन दोघेही ठाण्यात राहतात. हिरेन यांची चोरी झालेली स्कॉर्पिओ कार वाझे यांच्याकडे कशी आली याची माहिती मिळविण्यासाठी वाझे राहत असलेल्या सोसायटीचे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. आजतकने याची बातमी दिली आहे. 

 

अर्णब यांच्या अटकेसाठी ‘त्या’ स्कार्पिओचा वापर -साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडील चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. हिरेन यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओचा वापर सुमारे चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी (४ नोव्हेंबर) करण्यात आला होता. २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली होती. ती तेव्हा वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी यांच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाsachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणMumbai policeमुंबई पोलीस