शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

Antilia Bomb Scare : अखेर एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 15:00 IST

Antilia Bomb Scare: विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. थोडयाच वेळात त्यांना सत्र न्यायालयात रिमांडसाठी हजर केले जाईल.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापे टाकले. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्माएनआयएच्या रडारवर होते. लोणावळ्यातील रिसॉर्टमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. थोडयाच वेळात त्यांना सत्र न्यायालयात रिमांडसाठी हजर केले जाईल.

संतोष शेलार, आनंद जाधव यांनी चौकशीदरम्यान प्रदीप शर्मा यांचे नाव घेतले होते. आज सकाळी सहाच्या सुमारास कोणालाही सुगावा लागू न देता एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. शिवाय केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलांनाही तैनात करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता एनआयएची टीम जेबीनगरमध्ये दाखल होती. एनआयएची टीम, सीआरपीएफ १० ते १२ गाडया घटनास्थळी आहेत. याप्रकरणी प्रदीप शर्मा यांची भगवान भवन या अंधेरीतील इमारतीत ही चौकशी सुरु होती. अंधेरीतील हा उच्चभ्रू परिसर आहे. 

दरम्यान, याआधी या प्रकरणात एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी झाली होती. परंतु आता थेट छापा टाकून एनआयएनने झाडाझडती सुरु केली आहे. स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरण हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तसेच, याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे मित्र आहेत. याचबरोबर, या प्रकरणात नुकतीच एनआयएने संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. संतोष हा प्रदीप शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचे बोलले जाते, बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही एनआयएने चौकशीला बोलावले होते.

प्रदीप शर्मा यांची कारकीर्द 

१९८३ साली पोलीस सेवेत रूजू झालेले प्रदीप शर्मा हे घाटकोपर आणि माहीम ही दोन पोलीस ठाणी वगळता बहुतांश काळ मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. पोलिस दलात सर्वाधिक एन्काऊंटर करण्याची कामगिरी शर्मा यांच्याच नावावर आहे. त्यात मुंबई बॉम्बस्फोटातील 'लष्कर-ए-तोयबा'च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा समावेश आहे. त्यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता.

 

टॅग्स :Pradeep Sharmaप्रदीप शर्माArrestअटकNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाMansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझेraidधाड