शेतकऱ्याला पावणे दोन कोटीचा गंडा घालणाऱ्या आणखी एका ठगास दिल्लीतून घेतलं ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 20:43 IST2021-06-21T20:43:27+5:302021-06-21T20:43:42+5:30
सायबर पोलिसांनी कपूर याला दिल्लीतून अटक केली होती. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे व उपनिरीक्षक संदीप पाटील यांचे दोन पथक दिल्लीत दाखल झाले आहे.

शेतकऱ्याला पावणे दोन कोटीचा गंडा घालणाऱ्या आणखी एका ठगास दिल्लीतून घेतलं ताब्यात
जळगाव : म्युचिअल फंडच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन गंडा घालणाऱ्या विकास सुरींदर कपूर (रा.दिल्ली) याचा साथीदार सचिन राम गुप्ता (दिल्ली) याला जळगाव पोलिसांनी सोमवारी दिल्लीतून ताब्यात घेतले. दरम्यान, कपूर याच्या घराची पथकाने झडती घेतली. या घरझडतीत गुन्ह्यात वापरलेले दोन लॅपटॉप, हार्डडिस्क जप्त करण्यात आले असून इतर संशयितांचा शोध सुरु आहे.
सायबर ठगांनी वामन काशिराम महाजन (रा.अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) या शेतकऱ्याला १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला होता. सायबर पोलिसांनी कपूर याला दिल्लीतून अटक केली होती. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे व उपनिरीक्षक संदीप पाटील यांचे दोन पथक दिल्लीत दाखल झाले आहे.