शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक सोनम! लग्नाच्या ८ महिन्यातच मांडला मृत्यूचा खेळ; पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:13 IST

आपल्या प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकर आणि त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण हेच प्रेम जेव्हा क्रूरतेची सीमा ओलांडतं, तेव्हा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडतात. उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकर आणि त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. डोक्यात लोखंडाच्या रॉडने वार करून आणि मफलरने गळा आवळून हा खून करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मयत राजू हा मूळचा लखनऊचा रहिवासी होता. ८ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह पप्पी देवी हिच्यासोबत झाला होता. १४ जानेवारीला मकर संक्रांतीनिमित्त राजू आपल्या सासरी म्हणजे बलदेव नगर येथे संक्रांत खिचडी खाण्यासाठी गेला होता. सण साजरा करून १५ जानेवारीला तो जेव्हा घरी परतण्यासाठी निघाला, तेव्हा वाटेतच काळ टपून बसला होता.

सापळा रचून हत्या

पत्नी पप्पी देवीने आपला प्रियकर डॉक्टर मोहम्मद तफजील उर्फ मीनू आणि त्याचा मित्र आनंद कुमार यांच्यासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट आधीच रचला होता. नॅशनल हायवे-३० वरील खैराबाद टोल प्लाझाजवळ कमलापूर भागात या तिघांनी राजूला गाठले. पप्पी देवी तिथे स्वतः हजर होती. प्रियकर तफजील आणि आनंदने लोखंडी रॉडने राजूच्या डोक्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजूचा जीव जात नाही हे पाहून त्यांनी मफलरने त्याचा गळा आवळला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

ही हत्या नसून अपघात वाटावा, यासाठी आरोपींनी राजूचा मृतदेह रस्त्याशेजारील झाडीत फेकून दिला आणि तिथून पळ काढला. बराच वेळ होऊनही राजू घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, झाडीत मृतदेह आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.

अनैतिक संबंधातून पतीचा बळी

पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली तेव्हा पप्पी देवीचे कारस्थान उघड झाले. लग्नानंतरही पप्पीचे तिच्या माहेरच्या शेजारी राहणाऱ्या तफजीलसोबत प्रेमसंबंध सुरू होते. या प्रेमात पती अडथळा ठरत असल्याने तिने त्याला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी तत्परता दाखवत पप्पी देवी, प्रियकर तफजील आणि त्याचा साथीदार आनंद अशा तिघांनाही अटक केली आहे. त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेला रॉड आणि मफलर जप्त करण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wife, lover murder husband eight months after marriage in Uttar Pradesh.

Web Summary : In Uttar Pradesh, a wife, aided by her lover, murdered her husband who was an obstacle to their affair. The husband was attacked with a rod and strangled. Police arrested the wife, her lover, and an accomplice, seizing the murder weapon.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू