आणखी एक पीएनबी घोटाळा : मारुती सुझुकीच्या माजी व्यवस्थापकीय संचालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 04:17 PM2019-12-24T16:17:38+5:302019-12-24T16:19:40+5:30

२००८  मध्ये त्यांनी कारनेशन ही नवीन कंपनी सुरू केली.

Another PNB scam: Maruti Suzuki's former managing director arrested | आणखी एक पीएनबी घोटाळा : मारुती सुझुकीच्या माजी व्यवस्थापकीय संचालकाला अटक

आणखी एक पीएनबी घोटाळा : मारुती सुझुकीच्या माजी व्यवस्थापकीय संचालकाला अटक

Next
ठळक मुद्देजगदीश खट्टर १९९३ ते २००७ पर्यंत मारुतीमध्ये कार्यरत होत. २००७ मध्ये खट्टर एमडीच्या पदावरून निवृत्त झाले.इतर काही अज्ञात व्यक्तींविरूद्ध फसवणूक, बनावट आणि गुन्हेगारी कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार बनविणारी कंपनी मारुती सुझुकीचे माजी व्यवस्थापकी संचालक जगदीश खट्टर यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषणने (सीबीआय) फसवणूकीच्या प्रकरणात अटक केली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार खट्टर आणि त्यांची कंपनी कारनेशन ऑटो इंडिया (Carnation Auto India) ११० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात आरोपी आहेत.जगदीश खट्टर १९९३ ते २००७ पर्यंत मारुतीमध्ये कार्यरत होत. २००७ मध्ये खट्टर एमडीच्या पदावरून निवृत्त झाले. त्याच वेळी, २००८  मध्ये त्यांनी कारनेशन ही नवीन कंपनी सुरू केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारनेशनसाठी २००९ साली पंजाब नॅशनल बॅंकेकडून (पीएनबी) १७० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. २०१५ मध्ये, कर्ज एनपीए घोषित केले होते. यामुळे पीएनबीला ११० कोटी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणात पीएनबीने फौजदारी कट रचणे आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारीच्याआधारे सीबीआयने एफआयआर नोंदविला आहे. लवकरच याप्रकरणी बर्‍याच लोकांची चौकशी केली जाणार आहे. सीबीआयने त्यांच्यावर आर्थिक व्यवहारात घोटाळ्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याबरोबरच इतर काही अज्ञात व्यक्तींविरूद्ध फसवणूक, बनावट आणि गुन्हेगारी कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Another PNB scam: Maruti Suzuki's former managing director arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.