मुंबईतील आणखी एका मटका चालकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 21:37 IST2019-08-17T21:36:48+5:302019-08-17T21:37:13+5:30
सलीम मुल्ला कनेकशन

मुंबईतील आणखी एका मटका चालकास अटक
कोल्हापूर : मटका किंग सलीम मुल्ला याचेशी कनेकशन असलेल्या आणखी एका मुंबईतील मटका चालकास पोलीसांनी अटक केली.
आर. डी. तथा राजेंद्र उर्फ राजु धरमसी दवे-टोपी (वय ४०, रा. बोरीवली पश्चिम मुंबई) असे त्याचे नाव आहे. त्याला पुणे विशेष मोक्का न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मुल्ला गँगशी त्याचे संबध असून आर्थिक लाभासाठी मटक्याचे कनेकशन तो चालवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी दिली.
मोक्का कायद्यान्वये कारवाई झालेल्या मुल्ला टोळीचा म्होरक्या सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्लासह सातजण सध्या कारागृहात आहेत. चौकशीमध्ये मुंबईतील दवे-टोपी याचेशी मुल्ला गँगचे कनेकशन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला अटक केली. आतापर्यंत ४२ जणांना या गुन्ह्यात अटक केली आहे.