शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अजून एक 'कंझावाल प्रकरण', मृतदेहाला 10 KM फरफटत नेले, रस्त्यावर विखुरले तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 14:29 IST

मथुरातील यमुना एक्सप्रेस-वेवर दिल्लीतील कंझावालसारखी घटना घडली आहे.

मथुरा: काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या कंझावाल परिसरात तरुणीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती. तशाच प्रकारची घटना मथुरा जिल्ह्यात घडली आहे. यमुना एक्स्प्रेस वेवर एका स्विफ्ट कारने तरुणाचा मृतदेह सुमारे 10 किलोमीटरपर्यंत फरफटत नेला. टोल प्लाझावर गाडी थांबली तेव्हा  सुरक्षा रक्षकांनी हे भयंकर दृष्य पाहिले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचे तुकडे पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

मथुरेतील थाना मंत भागात यमुना एक्सप्रेस वेवर स्विफ्ट कारमध्ये अडकलेला मृतदेह आढळून आला आहे. अनेक किलोमीटरपर्यंत खेचल्यामुळे मृतदेहाचे तुकडे-तुकडे झाले होते. टोल भरण्यासाठी यमुना एक्स्प्रेस वे माँट टोलवर स्विफ्ट कार थांबताच गाडीमागील दृश्य पाहून सुरक्षा रक्षक चक्रावले. स्विफ्ट कारच्या मागे तरुणाचा मृतदेह लटकला होता. घाईघाईत ही माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतदेहाची अवस्था पाहून घटनास्थळी पोहोचलेले पोलीसही अचंबित झाले.

एसपी ग्रामीण त्रिगुण विशन यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर असे आढळून आले की यमुना एक्सप्रेसवेच्या माइलस्टोन 106 वर बूट, मोबाईल आणि मृतदेहाचे अवशेष पडलेले आहेत. या ठिकाणी अपघात झाल्याची शक्यता आहे. कार चालकाने सांगितले की, यमुना एक्स्प्रेस वेवर धुके होते, त्यामुळे मृतदेह गाडीला अडकल्याची माहिती नव्हती. अपघात अन्य कोणत्यातरी वाहनाने झाला असावा आणि त्याचा मृतदेह गाडीत अडकला असावा. सध्या एक्स्प्रेस वेवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिस अपघाताचे कारण शोधत आहेत.

दिल्लीतील कंझावाला प्रकरणाने देश हादरलाजानेवारी महिन्यात दिल्लीतील कंझावाला भागात असाच एक प्रकार समोर आला होता. एका इव्हेंट कंपनीत काम करणाऱ्या अंजली सिंग (20) या तरुणीच्या स्कूटीला एका कारने धडक दिली आणि मुलीला सुमारे 12 किलोमीटरपर्यंत खेचले. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. इतकंच नाही तर दिल्ली पोलिसांनी पेट्रोलिंगवर असलेल्या आपल्या 11 कर्मचार्यांनाही निलंबितही केले. 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूmathura-pcमथुराPoliceपोलिसtollplazaटोलनाका