लातूरातील देवणी-बोरोळ मार्गावरील अपघातातील दुसऱ्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 18:46 IST2021-07-27T18:46:21+5:302021-07-27T18:46:52+5:30
देवणी-बोरोळ या मार्गावरील एकाला झाडावर भरधाव कार आदळून अपघात झाला होता.

लातूरातील देवणी-बोरोळ मार्गावरील अपघातातील दुसऱ्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
देवणी (जि. लातूर) : साेमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या कार अपघातातील दुसऱ्या जखमी युवकाचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. अपघातातील मृत्यू झालेल्यांची संख्या दाेन झाली आहे.
पोलिसांनी सांगितले, सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बोरोळ येथील शरद रामचंद्र पाटील, सतीश वैजनाथ कोयले हे कारने देवणी येथून बोरोळ गावाकडे जात हाेते. दरम्यान देवणी-बोरोळ या मार्गावरील एकाला झाडावर भरधाव कार आदळून अपघात झाला होता. या अपघातात शरद रामचंद्र पाटील (४४) हे जागीच ठार झाले होते. तर सतीश वैजनाथ कोयले (३५) हे गंभीर जखमी झाले हाेते. जखमीला पुढील उपचारासाठी उदगीर येथील दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचाही मृत्यू झाला. कार अपघातातील मृताची संख्या दाेन झाली आहे. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.