शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाधवा पिता-पुत्रांविरुद्ध आणखी एक गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 07:05 IST

४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या एचडीआयएलच्या राकेशकुमार वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या एचडीआयएलच्या राकेशकुमार वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाहूर येथे सुरू असलेल्या मॅजेस्टिक प्रकल्पात वाधवा पिता-पुत्राने स्वस्त दरात आलिशान घर देण्याचे स्वप्न दाखवून ४००हून अधिक जणांची २०० कोटींना फसवणूक केली आहे. पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला.मालाडचे रहिवासी चंद्रकिशोर सोभाराम कोलींदीवाला (६९) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकिशोर यांचा टॅÑव्हलचा व्यवसाय आहे. २०१०मध्ये त्यांनी नवीन सदनिका घेण्याचे ठरवून शोध सुरू केला. त्याच दरम्यान दैनिकातून नाहूर येथे सुरू असलेल्या मॅजेस्टिक टॉवरबाबत माहिती मिळाली. तेथील दर परवडणारे असल्याने त्यांनी तेथे गुंतवणूक करण्याचे ठरवले. यामध्ये त्यांना साडेपाच हजार प्रती चौरस फुटाच्या दराने सदनिका देत, २०१३मध्ये ताबाही मिळणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, २०११मध्ये त्यांना १९व्या माळ्यावर ८६ लाख ३५ हजार ६८० रुपयांत १५७० चौरस फुटांचे घर देण्याबाबत व्यवहार ठरला. त्यांनी एचडीआयएल कंपनीस ८१ लाख रुपये दिले. हक्काच्या आलिशान घरात जाण्याचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात झाली. मात्र, २०१३ उलटूनही प्रकल्प अर्धवट राहिल्याने चंद्रकिशोर यांच्यावर हक्काच्या घरासाठी वणवण करण्याची वेळ ओढावली. सुरुवातीला विविध परवानग्यांअभावी काम रखडल्याचे सांगून टोलवाटोलवी सुरू झाली. पुढे, २०१५मध्येही घराचा ताबा न मिळाल्याने एचडीआयएलच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली.रेरा अ‍ॅथॉरिटीकडेही गुंतवणूकदारांनी धाव घेतली. तेथे २७ डिसेंबर रोजी कंपनीने बंद असलेले काम एप्रिल २०१९पर्यंत सुरू करीत ३० डिसेंबर २०२०पर्यंत ओसी प्राप्त करून गुंतवणूकदारांना सदनिकांचा ताबा देण्याबाबत सांगितले.काम पूर्ण न झाल्यास रेरा सेक्शन ७ नुसार, त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या. मात्र, तरीदेखील काम पूर्ण न झाल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा रेराकडे धाव घेतली. चंद्रकिशोर यांच्यासारख्या ४००हून अधिक जणांनी यात २०० कोटींची गुंतवणूक केल्याचे समोर येताच, त्यांनी एकत्रित येत गेल्या वर्षी मॅजेस्टिक टॉवर फ्लॅट ओनर असोसिएशन नावाने नोंदणी करत हक्काच्या घरासाठी लढा उभारला.पाठपुराव्याअंती अखेर १८ जानेवारी रोजी वाधवा पिता-पुत्रांसह ललित मोहन मेहता, संध्या बालीगा, राजकुमार अगरवाल, हजारी लाल, कंपनी सचिव दर्शन मुजुमदार विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.आम्हाला हक्काचे घर हवेआम्हाला ठरल्याप्रमाणे लवकरात लवकर हक्काचे घर मिळावे हीच अपेक्षा आहे. यात अनेकांना रस्त्यावर येण्याची वेळ ओढावली आहे. कामधंदा सोडून यामागे धावपळ सुरू आहे. काही जण तर सध्या भाड्याच्या घरात दिवस काढत आहेत. त्यामुळे हे प्रकरण लवकर निकाली लावणे गरजेचे आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी.- चंद्रकिशोर सोभाराम कोलींदीवाला, अध्यक्ष, मॅजेस्टिक टॉवर फ्लॅट ओनर असोसिएशनगुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्गवाधवा पिता-पुत्राविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई