शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बडतर्फ पोलिसांसह १२ जणांवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 15:03 IST

१७ लाखांची फसवणूक केल्याचा वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देआत्तापर्यंत टोळीवर एकूण पाचवा गुन्हा दाखल

पुणे : बडतर्फ पोलीस शैलेश जगताप आणि परवेज जमादार व त्यांच्या साथीदारांवर १७ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा आणखी एक गुन्हा वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार फेब्रुवारी २०१७ मध्ये घडल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे़. याप्रकरणी सोहन उत्तम आढाव (वय ३०, रा़ स्वामी विवेकानंदनगर, रामटेकडी, वानवडी) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.त्यानुसार प्रकाश फाले, त्यांची पत्नी सविता फाले, यश फाले, जयेश जगताप, शैलेश जगताप, परवेज जमादार, देवेंद्र जैन, रवींद्र बºहाटे, विनय मुंदडा, मुकेश पौडवाल, धिरज जाधव, विजय काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.प्रकाश फाले यांनी औंधमध्ये ब्रेमेन चौक येथीलजीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचा बंगला व शिवाजी हौसिंग सोसायटीमधील भुखंडाचे व्यवहार आपण करीत असून या व्यवहारात रक्कम गुंतविल्यास तुम्हाला दामदुप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखवून रामटेकडी येथील घरी येऊन १७ लाख रुपये टप्प्याटप्याने घेऊन फसवणुक केली़ गुंतवणुक केलेली रक्कम परत मागितल्यावर शैलेश जगताप यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जयेश् जगताप व परवेज जमादार यांनी शिवीगाळ केली़ यावेळी तेथे इतरही जण उपस्थित होते. हे सर्व एकाच रॅकेटचे मेंबर आहेत आणि विविध घटनास्थळी सक्रीय सहभाग आहे, यावरुन त्यांनी सर्वांनी कट रचून आपला विश्वासघात करुन फसवणूक केलेली आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे़ अशा प्रकाराचा सारखा मजकूर असलेली एक फिर्याद या आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहे.शैलेश जगताप, देवेंद्र जैन, रवींद्र बºहाटे यांच्यावर कोथरुड, समर्थ, खडक, हडपसर, डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. कोथरुड वगळता अन्य सर्व घटना या २०१२ पासून २०१८ च्या दरम्यान घडल्या असून त्याबाबत आता गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. यातील प्रमुख आरोपी रवींद्र बºहाटे हे अद्याप फरारी आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी