शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! चिनावल-सावदा परिसरात समाजकंटकांनी कापली केळीची बाग, ठिबक सिंचन साहित्य जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 11:29 IST

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील केळीच्या पट्ट्यात समाजकंटकांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात समाजकंटक केळीच्या बागा कापून टाकत आहेत.

जळगाव -  जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील केळीच्या पट्ट्यात समाजकंटकांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात समाजकंटक केळीच्या बागा कापून टाकत आहेत. रविवारी सकाळी देखील अशाच दोन घटना उघडकीस आल्या. चिनावल येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ठिबक सिंचन साहित्य जाळून टाकलं तर दुसऱ्या एका घटनेत केळीची बाग कापून टाकली आहे. या दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

चिनावल येथील शेतकरी प्रमोद भंगाळे यांच्या शेतातील 10 हजार केळी खोडांचे ठिबक सिंचन साहित्य समाजकंटकांनी जाळून टाकलंय. हे ठिबक सिंचन साहित्य भंगाळे यांनी गोळा करून शेताच्या बांधावर ठेवलं होतं. या घटनेत त्यांचं सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झालंय. दुसऱ्या एका शेतकऱ्याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्याच्या शेतातील केळीची बाग कापून टाकली आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार घडल्याचा संशय आहे.

संतप्त शेतकऱ्यांचा सावद्यात रास्तारोकोया दोन्ही घटना उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. पोलीस प्रशासनाने अशी कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी सावदा शहरातील मुख्य चौकात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी महामार्गावर दोन्ही बाजूला ट्रॅक्टर आडवे लावून वाहतूक रोखून धरली होती.

आमदार शिरीष चौधरींचा आंदोलनात सहभागया आंदोलनात रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनीही सहभाग नोंदवला. शेतीचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी, अशी मागणी करत त्यांनीदेखील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत शांतता राखण्याचे आवाहन केलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावagricultureशेती